स्वस्त आणि मस्त Airtelने सादर केले तीन नवे प्लान, मिळणार अनलिमिटेड ५जी डेटा

मुंबई: एअरटेलने नुकतेच आपल्या प्रीपेड आणि पोस्टपेड प्लानच्या किंमतीत वाढ केली आहे. टेलिकॉम कंपनीने घोषणा केली आहे की त्यांनी एंट्री लेव्हल प्लानच्या किंमतीत ७० पैशांची वाढ केली आहे. आता कंपनीने काही नवे बूस्टर पॅक सादर केले आहेत. एअरटेलने ५१ रूपयांचा, १०१ रूपयांचा आणि १५१ रूपयांचे तीन नवे बूस्टर पॅक सादर केले आहेत. नव्या टॉप अप डेटा प्लानमुळे युजर्सला अनलिमिटेड ५जी डेटाचा फायदा मिळेल.



नवे ५जी डेटा पॅक


एअरटेलने ५१ रूपयांपासून सुरू होणारे तीन नवे डेटा पॅक सादर केले आहेत. कंपनीने घोषणा केली आहे की युजर्सला अपग्रेड करण्यासाठी दररोज १ जीबी अथवा १.५ जीबी डेटा मिळणार तसेच ग्राहकांना ५जी स्पीड डेटा मिळेल.


एअरटेलने ५१ रूपये, १०१ रूपये आणि १५१ रूपयांचे बूस्टर प्लान सादर केले आहेत. कंपनीच्या ५१ रूपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना ३ जीबी ४जी डेटा, १०१ रूपयांच्या प्लानमध्ये ६ जीबी ४जी डेटा आणि १५१ रूपयांच्या प्लानमध्ये ९ जीबी ४जी डेटा मिळणार आहे. हे नवे डेटा पॅक सध्याच्या पॅकसोबत अॅक्टिव्हेट करू शकणार आणि अनलिमिटेड ५जी एन्जॉय करू शकणार आहे. याची व्हॅलिडिटी सध्याच्या प्लानइतकी असणार आहे.


किंमती वाढवल्यानंतर एअरटेलचा सर्वात स्वस्त ५जी प्लान २४९ रूपयांचा आहे. तर पोस्टपेड प्लान ४४९ रूपयांचा आहे. या प्लानबद्दल बोलायचे झाल्यास ग्राहकांना दररोज १ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉल्स, २४ दिवसाची व्हॅलिडिटी, विंकवर १ फ्री हॅलोट्यून आणि विंक म्युझिकचा अॅक्सेस दिला जातो.

Comments
Add Comment

संगीत साधनेच्या २० वर्षांचा उत्सव - १३६ वी प्रातःस्वर मैफल

प्रत्येक मैफलीत नवा कलाकार अशी संकल्पना मुंबई : भारतीय शास्त्रीय संगीताच्या संवर्धन व प्रचारासाठी गेली दोन

‘इंग्रजी’ भाषेत नामनिर्देशनपत्र, शपथपत्र भरण्याची मुभा

राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्तांना पत्र मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मराठीबरोबरच इंग्रजी भाषेतही

३०७ वर्षे नाताळ साजरा करणारे मुंबईतील ‘कॅथेड्रल’

चर्च आकर्षक रोषणाई आणि सजावटीने उजळले ‘चर्चगेट’ मुंबई : मुंबईत आणि उपनगरात सध्या नाताळनिमित्त उत्साहाचे

स्वबळाची भाषा करणाऱ्यांकडे उमेदवारांचा दुष्काळ

काँग्रेसकडे मुंबईतील ३० प्रभागांमध्ये एकही इच्छुक नाही उत्तर मुंबईत उमेदवार शोधण्यासाठी करावी लागणार

१६ जानेवारीला मुंबई जिंका; अटलजींना तीच खरी आदरांजली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन मुंबई : “अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा' हे अटलजींचे उद्गार

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.