रत्नागिरी : राज्यभरात सध्या पावसाचा जोर वाढला आहे. कोकणात मुसळधार पावसाने (Konkan Rain) दाणादाण उडवली आहे. त्यातच रत्नागिरीतील (Ratnagiri) महाविद्यालयात एक दुर्दैवी घटना घडली आहे. रत्नागिरीतील चिपळूणच्या डीबीजे कॉलेजमधली (DBJ College Chiplun) संरक्षक भिंत जोरदार पावसाच्या माऱ्यामुळे कोसळली. यात एक विद्यार्थी भिंतीखाली गाडला गेल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. महाविद्यालयाच्या परिसरात घटनेची माहिती कळल्यानंतर पोलीस दाखल झाले असून पुढील कारवाई सुरु आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
याबबात अधिक माहिती अशी की, अतिपावसाने डीबीजे महाविद्यालयाची संरक्षक भिंत ढासळली. यामध्ये १९ वर्षीय विद्यार्थ्याच्या अंगावर भिंत कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला. सिद्धांत घाणेकर असे मृत तरुणाचे नाव आहे. खेडमधील रहिवासी असलेला सिद्धांत घाणेकर चिपळूणमध्ये डीबीजे महाविद्यालयात शिक्षण घेत होता. हा विद्यार्थी बेपत्ता असल्याचं लक्षात आल्यानंतर शोधाशोध सुरू केली असता भिंतीच्या ढिगार्याखाली त्याचा मृतदेह सापडला.
सिद्धांत घाणेकर हा दापोली देगाव मधील रहिवासी होता. या विद्यार्थ्याने गेल्या वर्षी डीबीजे महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्स या विषयासाठी ऍडमिशन घेतली होती. तो सध्या दुसऱ्या वर्षाला शिक्षण घेत होता. सिद्धांत हा खेड तालुक्यातील लोटे येथे आपल्या मामाकडे राहत होता. मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी न परतला नाही. त्याची शोधाशोध सुरू होती. अखेर त्याच्या मोबाईलचं लोकेशन तपासण्यात आलं. हे लोकेशन चिपळूण डीबीजे महाविद्यालय परिसरात असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली
त्यानंतर पडलेली भिंत बाजूला करण्यात आली. ढिगाऱ्याखाली त्याचा दुर्दैवीरित्या मृतदेह आढळून आला. या धक्कादायक घटनेने कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हा विद्यार्थी मूळचा दापोली तालुक्यातील देगाव परिसरातील आहे. चिपळूण तालुक्याचे पोलीस अधीक्षक रवींद्र शिंदे व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. या विद्यार्थ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून रत्नागिरी, रायगड, नवी मुंबई, मुंबईसह ठाण्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. कोकणातही तुफान पाऊस पडत असून चिपळूणमध्ये पावसाने दाणादाण उडाली आहे. गुहागर मध्ये पोमेंडी गावातील नदीला पूर आल्याने दोन वाड्यांशी संपर्क तुटला होता. मुसळधार पावसाचा फटका गावातील स्वयंभू सोमेश्वर मंदिराला बसला असून पहिल्यांदाच मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी गेल्याची घटना घडली आहे. पावसाचा जोर वाढल्याने गुहागरची मुख्य बाजारपेठ असलेली शृंगारतळी भागात नागरी वस्तीमध्ये पाणी शिरून जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यातच आता चिपळूणच्या कॉलेजमध्ये हा दुर्दैवी प्रकार घडला आहे.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…