Akshay Kumar : बॉलिवूडच्या खिलाडीला कोरोनाची लागण!

Share

सरफिराचं प्रोमोशन आणि अनंत-राधिकाच्या विवाहसोहळ्याला राहणार अनुपस्थित

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ‘सरफिरा’ (Sarfira) हा आगामी चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. मात्र, याच चित्रपटाच्या प्रोमोशनदरम्यान अक्षयच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आज सकाळी केलेल्या चाचणीदरम्यान अक्षय कोव्हिड पॉझिटिव्ह (Covid Positive) असल्याचे समजले आहे. त्यामुळे आता सरफिराच्या प्रोमोशनमध्ये अक्षय सहभाग घेऊ शकणार नाही. तसेच आज होणाऱ्या अनंत-राधिकाच्या विवाहसोहळ्यालाही (Anant-Radhika Wedding) अक्षय कुमार उपस्थित राहू शकणार नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘सरफिरा’ या चित्रपटाच्या प्रोमोशनदरम्यान त्याला कोरोनाची लागण झाली आहे. अक्षय कुमारचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून त्याने स्वतःला विलगीकरणात ठेवले आहे. प्रोमोशनच्या वेळी त्याला अस्वस्थ वाटू लागले होते. त्यादरम्यान प्रोमोशन करणाऱ्या टीमचे काही क्रू सदस्य कोविड पॉझिटिव्ह आढळल्याची बाब त्याला समजली. त्यानंतर त्याने कोविड चाचणी केली आणि आज सकाळी त्याची चाचणी पॉझिटिव्ह आली.

कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर आता अक्षय कुमार ‘सरफिरा’ चित्रपटाचे कोणतेही प्रमोशन करणार नाही. त्याने स्वत: ला आयसोलेशनमध्ये ठेवले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, औषधोपचार सुरू असून अक्षय कुमार क्वारंटाईन आहे. तो चित्रपट आजच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

अनंत-राधिकाच्या विवाहसोहळ्याला राहणार अनुपस्थित

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा बीकेसी जिओ वर्ल्ड सेंटर येथे शाही विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. बॉलिवूडसह अनेक हॉलिवूड सेलिब्रिटी या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. मात्र, कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे अक्षय कुमार या सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नाही.

Recent Posts

अनधिकृत इमारतींची संख्या ही ११० ने वाढली

पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…

15 minutes ago

जलवाहिनी फुटल्याने २४ तास ‘पाणीबाणीचे’ मुंबईकरांसमोर संकट

काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…

53 minutes ago

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…

2 hours ago

World Book Day : भूतकाळासह भविष्यकाळातील दुवा म्हणजेच ‘पुस्तकं’

मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…

4 hours ago

‘टीनएजर्सच्या पालकांकडून अपेक्षा’

डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…

4 hours ago

समाजवादी विचारवंत ना. ग. गोरे

सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…

4 hours ago