नवी दिल्ली: दोन दिवसांच्या ऑस्ट्रिया दौऱ्यावर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या दिवशी व्हिएन्नामध्ये एका कार्यक्रमात सामील झाले. या दरम्यान त्यांनी भारतीय समुदायाला संबोधित केले आणि सांगितले की भारताने जगाला युद्ध नव्हे तर बुद्ध दिले आहेत. व्हिएनामध्ये झालेल्या या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी जसे मंचावर पोहोचले तसे लोकांनी मोदी, मोदी अशा घोषणा दिल्या.
त्यांनी तेथील भारतीय गटाला संबोधित करताना म्हटले, ऑस्ट्रिया हा माझा पहिला दौरा आहे. येथील उत्साह खरच अद्भुत आहे. ४१ वर्षांनी भारताचे पंतप्रधान येथे येत आहेत. ही प्रतीक्षा एका ऐतिहासिक क्षणी संपली आहे. भारत आणि ऑस्ट्रिया आपली ७५ वर्षांची मैत्री साजरी करत आहे.
पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणादरम्यान म्हटले, भौगोलिकदृष्टया भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन विविध दिशेला आहेत मात्र आमच्या दोघांमध्ये अनेक गोष्टींमध्ये समानता आहे. पंतप्रधान पुढे म्हणाले की लोकशाही या दोन्ही देशांना जोडते. स्वातंत्र्य, समानता, कायद्याचा आदर ही आमची मूल्ये आहेत.
व्हिएनामध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले, ६० वर्षानंतर एका सरकारला सलग तिसऱ्यांदा सेवा करण्याची संधी भारतात मिळाली आहे. आम्ही जगात कोविडनंतर चारही बाजूला राजकीय अस्थिरता पाहिला. अधिकतर देशांत सरकारसाठी सर्व्हाईव्ह करणे सोपे नव्हते. पुन्हा निवडून येणे हे मोठे आव्हान होते. अशा स्थिती भारताच्या जनतेने माझ्यावर तसेच माझ्या पक्षावर पुन्हा विश्वास दाखवला. एनडीएवर विश्वास दाखवला यावरून हे दिसते ती भारताला स्थिरता हवी आहे.
बारामुला : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य करुन गोळीबार केला. या हल्ल्यात २६…
मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…