Karnataka news : कर्नाटकात 'रामनगर' शहराचे नाव बदलण्याचा काँग्रेसचा डाव!

भाजपा-जेडीएसचा कडाडून विरोध


बंगळुरु : कर्नाटकात (Karnataka News) काँग्रेसचे सरकार (Congress government) असल्याने ते अनेक हिंदूंविरोधी निर्णय घेत आहेत. त्यांच्या या निर्णयाला भाजपा (BJP) कडाडून विरोध करत आहे. काँग्रेस सरकारने कर्नाटकमधील रामनगर (Ramnagar) जिल्ह्याचं नाव बदलण्याची निर्णय घेतला असल्याची चर्चा सुरु झाली आहे. या नामांतराच्या मुद्द्यावरून राजकारणाला तोंड फुटलं आहे. विरोधी पक्षातील भाजपा तसेच जेडीएसकडून कर्नाटकमधील काँग्रेस सरकारच्या या निर्णयाला तीव्र विरोध होत आहे. रामनगर जिल्ह्याच्या नावात राम असल्याने काँग्रेस सरकार या जिल्ह्याचं नाव बदलून बंगळुरू दक्षिण असं करण्याचा प्रयत्न करत आहे, आम्ही हे कदापि मान्य करणार नाही, असे भाजपाने म्हटले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटक सरकारमधील उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी रामनगर जिल्ह्याचं नाव बदलून बंगळुरू दक्षिण असं करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री सिद्धारामैय्या यांच्याकडे पाठवला आहे. शिवकुमार यांनी रामनगर जिल्ह्याचं नाव बदलण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्याची ही दुसरी वेळ आहे. शिवकुमार आणि इतर काही जणांनी सिद्धारामैय्या यांच्याकडे एक पत्रक देत रामनगर जिल्ह्याचं नाव बदलून बंगळुरू दक्षिण करावं, अशी विनंती केली आहे.



नामांतराच्या प्रस्तावावर उपमुख्यमंत्र्यांसह १३ जणांच्या सह्या


रामनगर जिल्ह्याच्या नामांतरासाठी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रकावर डी. के. शिवकुमार यांच्यासह १३ जणांनी सह्या केल्या आहेत. त्यामध्ये परिवहनमंत्री रामलिंगा रेड्डी, बंगळुरू ग्रामीणचे माजी खासदार डी. के. सुरेश यांचाही समावेश आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर शिवकुमार यांनी सांगितले की, बंगळुरू शहराला असलेल्या जागतिक प्रतिष्ठेचा फायदा शहराजवळ असलेल्या रामनगर, मगदी, कनकपुरा, चन्नपटना आणि हरोहल्ली तालुक्यांना व्हावा हा नाव बदलण्याची मागणी करण्यामागचा उद्देश आहे.



कर्नाटकमध्ये सत्तांतर झाल्यावर पुन्हा नाव रामनगर करू : सी. एन. अश्वथ नारायण


कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री सी. एन. अश्वथ नारायण यांनी सांगितले की, रामनगर जिल्ह्याचं नाव बदलण्यासाठी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी पुढाकार घेतला आहे. ते रामनगर जिल्ह्याचा कधीही विकास करणार नाहीत. त्यांनी मेडिकल कॉलेजसुद्धा कनकपुरा येथे स्थलांतरीत केले आहे. लोक हे मान्य करणार नाहीत. तर माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी कर्नाटकमध्ये राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा या जिल्ह्याचं नाव रामनगर करू, असे सांगितले.



रामविरोधी मानसिकता शिगेला पोहोचली आहे : शहजाद पुनावाला


दरम्यान, भाजपा नेते शहजाद पुनावाला यांनी सांगितले की, सध्याच्या काँग्रेस पक्ष हा हिंदू धर्माचा द्वेष करतो. तसेच या पक्षाची रामविरोधी मानसिकता शिगेला पोहोचली आहे. आपण राम जन्मभूमी आंदोलनाला पराभूत केले, असा दावा राहुल गांधी यांनी हल्लीच केला होता. आता डी. के. शिवकुमार यांना रामनगर नाव नावडतं झालं आहे कारण ते श्री रामांच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे, असा आरोप त्यांनी केला.

Comments
Add Comment

Mamta kulkarni : वाद वाढताच ममता कुलकर्णीचा 'यू-टर्न'; 'दाऊद दहशतवादी नाही' म्हणणारी अभिनेत्री आता म्हणाली...

'मी दाऊदबद्दल नाही, तर विकी गोस्वामीबद्दल बोलत होते...  अभिनयक्षेत्रातून अध्यात्माकडे वळलेली अभिनेत्री ममता

फेसबुक वापरल्याच्या क्षुल्लक कारणावरून संतापलेल्या पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या!

हाजीपूर, बिहार: बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील बिदुपूर पोलीस स्टेशन हद्दीत एक अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून

२१,०००च्या गुंतवणुकीवर १५ लाख मिळवण्याचा दावा खरा की खोटा?

अर्थमंत्र्यांच्या नावाने 'खोटी' गुंतवणूक योजना! सावध राहण्याचे अर्थ मंत्रालयाचे आवाहन नवी दिल्ली: केंद्रीय

न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे नवे सरन्यायाधीश; २४ नोव्हेंबर रोजी पदभार स्वीकारणार

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांची भारताचे ५३वे सरन्यायाधीश म्हणून

भारताला सागरी रोजगाराचे जागतिक केंद्र बनवणार!

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी व्यक्त केला इंडिया मेरीटाईम वीकमध्ये विश्वास नवी दिल्ली : केंद्रीय

बिहारला ‘जंगलराज’ पासून वाचवा!

गृहमंत्री शहा आणि नड्डा यांचा बिहारच्या मतदारांना इशारा पाटणा: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे