अलिबाग : तालुक्यातील शहापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील शहापूर (Shahapur) गावात गेल्या चार वर्षांपासून पिण्याचे पाणी येत (Water Supply) नसल्याने पाणी विकतचे आणावे लागते. यापुढे प्रत्यक्ष नळाद्वारे पिण्याचे पाणी घरात येईपर्यंत रायगड (Raigad) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड यांना एक हजार स्मरणपत्रे पाठविण्याचा निर्णय ग्रामस्थांच्या वतीने स्थानिक ग्रामस्थ राजन भगत यांनी घेतला आहे.
राजन भगत यांनी तसे पत्र ८ जुलै रोजी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड यांना पाठविले. आदर्शनगर या भागात मुख्य रस्त्यापासून १० मीटर अंतरावर आहे. त्याची नळजोडणी जलवाहिनीच्या ज्या सर्व्हिस लाईनवर होती, ती सर्व्हिस लाईन ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा विभागाने न सांगता काढून नेली. तेंव्हापासून ग्रामस्थांना पिण्याचे पाणी येणे बंद झाले. हे ग्रामस्थ सर्वचजण वरिष्ठ नागरिक व निवृत्त शिक्षक असल्याने रोजच्या गरजेसाठी दर १५ दिवसांनी पाणी विकत घेतात.
सर्व्हिस लाईन व जलजीवन याचा काडीमात्र संबंध नसल्याचे सांगताना भारतीय राज्य घटनेतील कलम २१ अन्वये प्राप्त मुलभूत अधिकारात आम्हाला पिण्याचे पाणी मिळण्याचा अधिकार नमूद आहे. सर्वच जण आमच्या प्राप्त मूलभूत अधिकारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत असून, आमच्या जगण्याच्या अधिकारावर गदा आणत आहेत. याबाबत महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग, मुंबई यांच्याकडे नव्याने तक्रार दाखल केल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
मुंबई : भारतीय क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत वानखेडे स्टेडियमवर एक धक्कादायक घटना घडली…
मुंबई : बॉलीवूडचा किंग खान म्हणून शाहरुख खानची ओळख आहे. अनेकदा तो आणि त्याचे कुटुंब…
मुंबई : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून स्वत:ची ओळख निर्माण करणारा 'फिल्टरपाड्याचा बच्चन' म्हणजेच गौरव मोरे…
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना विमान कंपनीच्या गैरव्यवस्थापनाचा चांगलाच फटका बसला. अब्दुल्ला…
छत्तीसगड : छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात आईस्क्रीम कारखान्यात एक धक्कादायक घटना घडली. कारखान्याच्या मालकाने चोरीच्या संशयावरुन…
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…