मुंबई: वास्तुशास्त्रात घरातील काही गोष्टी योग्य दिशेला ठेवण्याचे नियम सांगितले आहेत. घरात ठेवलेली एक चुकीची गोष्ट व्यक्तीचे सौभाग्य दुर्भाग्यात बदलू शकते.
वास्तुशास्त्रानुसार जाणकार म्हणतात की घरातील मुख्य दिशेला काळ्या रंगाच्या गोष्टी कधीच ठेवू ने. ही एक चूक व्यक्तीला महागात पडू शकते.
स्वर्गातील देवतांचे कोषाध्यक्ष भगवान कुबेर हे उत्तर दिशेचे प्रमुख असतात. या दिशेला कधीही काळ्या रंगाच्या वस्तू ठेवू नयेत. काळ्या रंगाचे फर्निचर, काळ्या रंगाचे पडदे, काळ्या रंगाचे पेंटिग अथवा इतर कोणतेही सामान या दिशेला ठेवू नये. याचे परिणाम अशुभ मिळतात.
उत्तर दिशेला काळ्या रंगाच्या वस्तू ठेवल्याने घरात नकारात्मक उर्जेचा संचार वाढतो. राहूशी संबंधित समस्या माणसाला येऊ लागतात. घराच्या उत्तर दिशेला तुटकेफुटके सामानही ठेवू नये. तसेच तुटलेला आरसाही या दिशेला ठेवू नये.
उत्तर दिशेला काय ठेवावे?
उत्तर दिशेला तिजोरी, रूपये-पैसा, मंगळसूत्र अथवा दागिने ठेवणे शुभ मानले जाते. अशा घरात कधीच धनाचा अभाव येत नाही. द्रारिद्य दूर राहते.