ST Bus : मुसळधार पावसामुळे रेल्वेसेवा ठप्प! जाणून घ्या एसटी बस कुठून व कधी सुटणार?

Share

हार्बर रेल्वे तसेच मेल एक्स्प्रेस रद्द झाल्याने अडकलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी बससेवा

मुंबई : मुंबईत काल रात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे (Mumbai heavy rainfall) मुंबईचे चांगलेच हाल झाले आहेत. अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी साचलं आहे तर रेल्वेसेवाही (Mumbai Railway) ठप्प झाली आहे. काही रेल्वे जागच्या जागी थांबल्या, त्यामुळे प्रवासी थेट पटरीवर उतरले आणि चालत निघाले. हार्बर रेल्वेसेवा (Harbour railway) देखील बंद झाली आहे. यामुळे या मार्गावर अडकलेल्या प्रवाशांसाठी एसटी बसची (ST Bus) सुविधा उपलब्ध असणार आहे. नेमक्या या बसेस कुठून व कधी सुटणार हे जाणून घ्या.

आज ८ जुलै रोजी हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक बंद असल्याने तेथे अडकलेल्या प्रवाशांसाठी या बसेस असणार आहेत-
१) पनवेल ते दादर मार्गावर ९.००, ९.०५, १०.१५, १०.३०, १०.४०
२) पनवेल ते वाशी १०.२०
३) उरण ते दादर ५.३०, ६.३०, ७.००, ७.३०, ८.१५, ८.४५, ९.१०, ९.३०, १०.३०

त्याचप्रमाणे मेल एक्सप्रेस रद्द करण्यात आल्याने येथील प्रवाशांच्या सोयीसाठी भिवंडी, ठाणे, त्र्यंबकेश्वर, सातारा, कराड या बसेस तसेच श्रीवर्धन रायगड, चिपळूण, शिवथर रत्नागिरी बसेस छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानका (सीएसएमटी) वरुन सोडण्यात येत आहेत. एसटी महामंडळाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

Recent Posts

अनधिकृत इमारतींची संख्या ही ११० ने वाढली

पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…

29 minutes ago

जलवाहिनी फुटल्याने २४ तास ‘पाणीबाणीचे’ मुंबईकरांसमोर संकट

काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…

1 hour ago

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…

2 hours ago

World Book Day : भूतकाळासह भविष्यकाळातील दुवा म्हणजेच ‘पुस्तकं’

मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…

4 hours ago

‘टीनएजर्सच्या पालकांकडून अपेक्षा’

डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…

4 hours ago

समाजवादी विचारवंत ना. ग. गोरे

सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…

5 hours ago