मुंबई: सकाळी उठताच आपल्या दिवसाची नवी सुरूवात होते. संपूर्ण दिवस तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबियांसाठी शुभ असेल की नाही हे तुमच्या कार्यावर अवलंबून असते. याच कारणामुळे शास्त्रात अशी काही कामे सांगितली आहेत जी सकाळी उठून करू नये. यामुळे संपूर्ण दिवस अशुभ जाऊ शकतो.
महिलांनी सकाळी उठल्यावर विशेष करून काही कामे करू नयेत. याचे कारण आहे की महिलांना घरची लक्ष्मी मानली जाते. घराची आर्थिक परिस्थिती, आनंद, समृद्धी हे स्त्रीशी संबंधित असते. यामुळेच स्त्रीने केलेल्या कामाचा प्रभाव घर-कुटुंबावर होतो.
करू नका ही कामे
उंबऱ्यावर बसू नका
महिलांनी सकाळी उठल्यावर उंबऱ्यावर बसू नये. शास्त्रानुसर सकाळच्या वेळेस उंबऱ्यावर बसल्याने घराची समृद्धी निघून जाते.
वाद घालू नका
लक्ष्मी मातेचा त्याच घरात प्रवेश होतो जेथे आनंद आणि शांती असते. यामुळे सकाळी सकाळी वाद घालू नका.
आरसा पाहू नका
अनेक महिला सकाळी उठताच आरशात स्वत:ला पाहतात. मात्र शास्त्रात हे योग्य नाही सांगितले आहे. असे केल्याने तुमच्यामध्ये नकारात्मकतेचा प्रवेश होऊ शकतो.
सावली पाहू नका
आरशासोबत महिलांनी सकाळी उठल्यावर आपली सावलीही पाहू नये. याचे कारण आहे सूर्योदय पूर्व दिशेने होतो. तसेच पश्चिम दिशेला पाहिलेली सावली वास्तुशास्त्रात राहूचे संकेत मानले जातात.
भाग्याला कोसणे
अनेक महिला सकाळी उठल्यावर आपल्या नशिबाला बोल लावत असतात. मात्र तुमच्या या सवयीने लक्ष्मी माता नाराज होऊ शकते.