गडचिरोली : गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील चामोर्शी येथून एक अत्यंत संतापजनक बातमी समोर आली आहे. घरात पेंटिंगचे काम करण्यासाठी आलेल्या एका २७ वर्षीय नराधम पेंटरने अवघ्या ७ वर्षांच्या चिमुकलीवर जबरदस्तीने अत्याचार (Abuse) केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून, मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून अवघ्या काही तासांतच आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. (Crime News)
Chhatrapati Sambhajinagar : बंदी असलेल्या गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूच्या वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अन्न व औषध प्रशासन (FDA) पथकावर गुंड ...
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित ७ वर्षीय मुलगी आपल्या घराच्या स्लॅबवर खेळत होती. याच दरम्यान त्यांच्या घरी पेंटिंगचे काम सुरू होते. तिथे काम करणाऱ्या प्रज्वल नावाच्या २७ वर्षीय पेंटरने चिमुकलीला एकटे पाहून गैरफायदा घेतला. त्याने मुलीला बाजूला नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या भयंकर प्रसंगानंतर घाबरलेल्या मुलीने तात्काळ आपल्या कुटुंबीयांना घडलेला प्रकार सांगितला. हे ऐकताच पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली.
कुटुंबीयांनी वेळेचा अपव्यय न करता थेट चामोर्शी पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ६४(१), ६५(२) आणि पॉक्सो (POCSO) कायदा २०१२ च्या कलम ४ व ६ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तत्परता दाखवत काही तासांच्या आतच आरोपी प्रज्वलला अटक केली. आरोपीवर यापूर्वीही २०१९ मध्ये अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता.
मुंबई: 'बिग बॉस' फेम स्टँड-अप कॉमेडियन प्रणीत मोरेच्या (Pranit More) शोमधील एका व्हायरल व्हिडिओमुळे (Viral Video) आता नवा वाद निर्माण झाला आहे. या व्हिडिओमध्ये वैद्यकीय ...
या घटनेचे पडसाद चामोर्शी शहरात उमटले असून विविध संघटनांच्या वतीने तीव्र निषेध मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी चामोर्शी पोलीस ठाण्यावर धडक देत पोलिसांना निवेदन सादर केले. "आरोपीविरुद्ध जलदगती न्यायालयात (Fast Track Court) खटला चालवून त्याला कठोर पाऊल उचलत फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा द्यावी," अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांकडून अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नागरिकांनी शांततेच्या मार्गाने निषेध नोंदवत पीडित मुलीला न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. या क्रूर घटनेनंतर पालकांमध्ये कमालीची भीती आणि संतापाचे वातावरण असून, आता पोलीस आणि न्यायालय या नराधमावर काय कठोर कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




