SSC-HSC Exam : दहावी-बारावी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पुरवणी परीक्षेची तारीख जाहीर

मुंबई : दहावी आणि बारावीच्या (SSC-HSC Exam) परीक्षेत अनुत्तीर्ण (Fail) झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर येत आहे. परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुरवणी परीक्षा (Supplementary Exam) घेण्यात येते. यंदा दहावी बारावी परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षात लवकरात लवकर प्रवेश मिळावा यासाठी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये परीक्षा न घेता जुलै-ऑगस्टमध्ये परीक्षा घेण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. यासंदर्भात तारीख देखील जाहीर केल्या आहेत.



'या' तारखेला होणार पुरवणी परीक्षा


दहावी आणि बारावीच्या विद्यार्थींची पुरवणी परीक्षा जाहीर झाली आहे. १६ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान परीक्षा होणार आहे. दहावीची पुरवणी परीक्षा १० जुलै ते ३० ऑगस्ट दरम्यान होणार आहे. तर बारावीची १६ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे.


दरम्यान, दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी कोणतेही शुल्क न घेता प्रवेशपत्राची मुद्रित प्रत विद्यार्थ्यांना देण्याची सूचना राज्य मंडळाचे प्रभारी सचिव शैलेंद्र पाटील यांनी केली आहे.

Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात