Ladki Bahin Yojana : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'साठी आजपासून मिळणार ऑफलाईन अर्ज

जाणून घ्या पात्र, अपात्रतेचे निकष


मुंबई : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'ची (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) घोषणा केली आणि तेव्हापासून राज्यातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या योजनेद्वारे २१ ते ६० वर्षे वयोगटातील महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत. म्हणून आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये महिलांची झुंबड उडाल्याचं चित्र आहे.


सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचं कौटुंबिक उत्पन्न वर्षाला २ लाख ५० हजार ५०० रुपयांपेक्षा कमी असावं असा निकष आहे. या योजनेसाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात महिलांनी प्रचंड गर्दी केली आहे. यासाठी पात्र अपात्रतेचे निकष लावण्यात आले आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी शंभर रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर शपथपत्र द्यावं लागणार आहे. हाच स्टॅम्पपेपर विकत घेण्यासाठी महिलांच्या मोठ्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, जाणून घेऊयात लाडकी बहीण योजनेचे पात्र आणि अपात्रतेचे निकष-



योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळणार?



  • लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणं आवश्यक आहे.

  • राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला.

  • किमान वयाची 21 वर्ष पूर्ण आणि कमाल वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत.

  • सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बैंक खाते असणं आवश्यक आहे.

  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2.50 लाखांपेक्षा जास्त नसावं.


अपात्र कोण?



  • 60 वर्षांपेक्षा जास्त वयाची महिला

  • 2.50 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न

  • घरात कुणी आयकरदाता असल्यास

  • कुटुंबातील कुणी सरकारी नोकरीत किंवा पेन्शनवर असेल तर

  • कुटुंबात 5 एकरपेक्षा जास्त उत्पन्न


योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा?



  • योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज

  • लाभार्थ्यांचं आधार कार्ड

  • महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला

  • राक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंबप्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापर्यंत असणं अनिवार्य)

  • (बँक खातं पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स कॉपी)

  • पासपोर्ट आकाराचा फोटो

  • रेशनकार्ड

  • सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचं हमीपत्र


एकूणच अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना जाहीर केल्यापासूनच महाराष्ट्रभरातील महिलांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रभर महिलांची गर्दी प्रत्येक ठिकाणी उसळलेली दिसून येत आहे. त्यामुळे पात्र महिलांची नोदंणी लवकरात लवकर करून त्यांना योजनेचा लाभ देण्याचं आणि यात कोणतीही गडबड होऊ न देण्याचं मोठं आव्हान शासन आणि प्रशासनासमोर आहे.

Comments
Add Comment

निवडणुकीच्या धामधुमीत जळगावात गोळीबार!

निवडणुकीशी संबंध नसल्याचे पोलिसांचे स्पष्टीकरण जळगाव : जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात असलेल्या आनंद मंगल

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह