Ambadas Danve : शिवीगाळ करणं पडलं महागात! अंबादास दानवेंना केलं निलंबित

Share

विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केली घोषणा

मुंबई : विधानपरिषदेत (Vidhanparishad) कालच्या अधिवेशनात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी आपल्याकडे हात करणाऱ्या भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांना शिवीगाळ केली. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) वक्तव्यावरुन महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत काल राडा झाला होता. यादरम्यान, दानवेंनी शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांना पाच दिवसांकरता निलंबित करण्यात आलं आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी ही घोषणा केली.

‘बाटगा प्रसाद लाड मला हिंदूत्व शिकवणार आहे का?’ असं वक्तव्य अंबादास दानवेंनी केलं होतं. यानंतर आज प्रसाद लाड यांनी आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. अंबादास दानवेंनी माफी मागावी, आणि त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली. तर चंद्रकांत पाटील यांनीही दानवेंच्या निलंबनाची मागणी केली. चंद्रकांत पाटील म्हणाले, अंबादास दानवे यांनी प्रसाद लाड यांच्याकडे पाहत अर्वाच्य भाषा वापरली आहे. त्यांच्या बेशिस्त वर्तनाबाबत पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात यावे.

यानंतर आज नीलम गोऱ्हे यांनी अंबादास दानवे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला व तो मतदानाकरता देण्यात आला. आवाजी मतदानाने अंबादास दानवे यांचं निलंबन करण्यात आलं. अंबादास दानवेंच्या निलंबनाची घोषणा करताच सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाले.

नीलम गोऱ्हे यांनी विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलण्याच्या परवानगी दिली असता देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले आणि त्यांनी आक्षेप घेतला. सभागृहात अशी घटना कधीही घटना घडली नाही त्यामुळे अशा ठरवावर कधीही चर्चा होत नाही, असे फडणवीस म्हणाले. यानंतर विरोधकांना संधी न देता पुढील कामकाज सुरु करण्यात आलं.

निलंबनानंतर नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या?

उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या, गटनेत्यांच्या बैठकीला अंबादास दानवे उपस्थित नव्हते. कालच्या प्रकाराबाबत त्यांनी माफी मागितली नाही. काल आमच्या समोर हा प्रकार घडला. त्यांच्या पक्षाच्या नेतेमंडळीनी विचार करायला हवं की, संबंधित व्यक्ती महिलांसमोर अशी भाषा वापरत आहे, हे गंभीर आहे. महिलांना काम करणं भविष्यात मुश्किल होईल. म्हणून ही न्याय्य आणि उचित कारवाई केली आहे, असं उपसभापती गोऱ्हे यांनी स्पष्ट केलं.

Recent Posts

पंतप्रधान मोदी २२-२३ एप्रिलला सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…

9 minutes ago

बनावट पनीर विक्रेत्यांवर आता एफडीएची नजर

ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…

40 minutes ago

अनधिकृत इमारतींची संख्या ही ११० ने वाढली

पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…

1 hour ago

जलवाहिनी फुटल्याने २४ तास ‘पाणीबाणीचे’ मुंबईकरांसमोर संकट

काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…

2 hours ago

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…

3 hours ago

World Book Day : भूतकाळासह भविष्यकाळातील दुवा म्हणजेच ‘पुस्तकं’

मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…

5 hours ago