New Rules : सामान्यांच्या खिशावर परिणाम होणार; जुलैपासून नियमावली बदलणार!

मुंबई : प्रत्येक महिन्याच्या १ तारखेपासून अनके गोष्टींच्या नियमांमध्ये (New Rules) बदल होतात. उद्यापासून म्हणजेच १ जुलै २०२४ पासूनही अनेक नियम बदलणार आहेत. ज्यामुळे सामान्यांच्या खिशावर थेट परिणाम होणार आहे. सध्या देशातील टेलिकॉम क्षेत्रातील जिओ, एअरटेल, आयडिया व वोडाफोन या कंपन्यांनी रिचार्ज किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच आणखी काही गोष्टींच्या सेवेबाबत नियम बदल होणार आहेत. त्यामुळे सामान्यांच्या खिशावर याचा बोजा वाढणार की भार हलका होणार त्याबाबत जाणून घ्या.



सिमकार्ड पोर्ट कालावधी


सिमकार्ड पोर्ट करण्याचा कालावधी कमी करण्यात आला आहे. या आधी ग्राहकांना सिमकार्ड पोर्ट करण्यासाठी तब्बल १० दिवसांचा कालावधी लागत होता. मात्र आता सिमकार्ड पोर्ट करून हवे असेल तर फक्त सात दिवसांचा कालावधी लागणार आहे.


काहीवेळा फोन चोरी होतो तेव्हा आपण ते सिम बंद करून दुसरे सिम खरेदी करतो. तर नव्या नियमानुसार तुम्हाला आता नवीन सिम खरेदीसाठी ७ दिवस वाट पहावी लागणार आहे. वाढत असलेल्या चोरींच्या घटनांमुळे TRAI ने हा निर्णय घेतला आहे.



क्रेडिट कार्ड


क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांची संख्या आता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तुम्ही देखील क्रेडिट कार्ड वापरत असाल तर येथून पुढे भारत बिल पेमेंट सिस्टमद्वारे क्रेडिट कार्ड पेमेंटची प्रक्रिया करावी लागेल. सर्व बँकांना याबाबत आदेश देण्यात आले आहेत.



गॅस सिलिंडर


प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोलियम कंपन्या LPG सिलेंडर आणि एटीएफच्या किमतीत बदल करतात. त्यात बजेटमध्ये वर्षाला तीन सिलिंडर फ्री देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे १ जुलैपासून तुम्हाला गॅस सिलिंडरवरही दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

भारत-नेपाळ सीमेवर कारवाई; व्हिसा नसल्याने दोन विदेशी नागरिक अटकेत

नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ १० नोव्हेंबर रोजी झालेल्या कार बॉम्बस्फोटानंतर सुरक्षा यंत्रणा आणि

छत्तीसगडमधील सुकमात चकमक, तीन नक्षलवादी ठार

सुकमा : छत्तीसगडमधील सुकमाच्या जंगलात सुरक्षा पथक आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत तीन माओवादी

दहशतवादी उमरच्या घरात होता बॉम्ब निर्मितीचा कारखाना

फरिदाबाद : दिल्ली कार स्फोट आणि दहशतवादी उमर यांच्याबाबत नवनवी माहिती हाती येऊ लागली आहे. स्फोट घडवणाऱ्या

तीन दिवसांत 28 काळवीटांचा मृत्यू; कर्नाटक प्राणीसंग्रहालयावर संशयाचे सावट

कर्नाटक : बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर राणी चेन्नम्मा प्राणीसंग्रहालयात गेल्या तीन दिवसांत तब्बल 28 काळवीटांचा

गांधीनगर रेल्वेस्थानकाचा पुनर्विकास आधुनिक सुविधांनी होणार सज्ज

सीमा पवार गांधीनगर : जयपूरमधील गांधीनगर रेल्वेस्थानक लवकरच आधुनिक सुविधांनी सज्ज होणार आहे.‘अमृत भारत स्टेशन

पती संभाळ करत असला तरी आई मुलाकडून पालनपोषण खर्च मागू शकते

केरळ उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय तिरुवनंतपुरम  : पती जिवंत असेल आणि पत्नीचा सांभाळ करत असला तरीही आई