मुंबई: ज्योतिषशास्त्रात शनीला अतिशय महत्त्वाचा ग्रह मानला गेला आहे. शनी देवाच्या प्रभावामुळे व्यक्तीच्या जीवनात मोठे बदल होतात. शनी देवाला न्यायाची देवता आणि कर्म फल दाता म्हटले गेले आहे. शनी देव व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार शुभ-अशुभ फळ देत असतात.
शनी आता कुंभ राशीत आहेत. हे संपूर्ण वर्ष शनी या राशीत असतील. कुंभ राशीत असताना शनी २९ जून २०२४ला वक्री होणार आहे. शनी १५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत कुंभ राशीत वक्री अवस्थेत असणार आहेत. वक्री झाल्याने काही राशींचा उद्धार होणार आहे.
शनीच्या उलट्या चालीचा फायदा वृषभ राशीला मिळणार आहे. याचा परिणाम म्हणून तुम्हाला धन आणि करिअरमध्ये खूप यश मिळेल. व्यापारात फायदा होईल. तुमची थांबलेल्या योजना पुन्हा वेग घेतील. या राशीच्या लोकांची थांबलेली कामे पूर्ण होतील. लाभाचे योग बनत आहेत. वक्री झाल्याने वृषभ राशीच्या लोकांना लाभ होणार आहे. तुमच्या वैवाहिक समस्याही दूर होतील. मोठ्या प्रवासाला जाण्याआधी थोडे लक्ष द्या. कोणाला दिलेल्या उधार गोष्टी परत मिळतील.
शनीच्या उलट्या चालीमुळे कर्क राशीच्या लोकांना महत्त्वाचे फायदे मिळतील. तुम्हाला काही क्षेत्रात तुम्ही कल्पना केली नसेल इतके यश मिळेल. तुमचे सहकारी कामाच्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण सहकार्य करतील. यामुळे कामाच्या ठिकाणीही प्रबळ स्थिती राहील. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.
शनी वक्री झाल्याने त्याच्या प्रभावामुळे तुम्ही व्यापारात तसेच कामाच्या ठिकाणी यश मिळवाल. भाऊ-बहिणींबद्दलचे प्रेम वाढेल आणि त्यांची मदत कराल. भाग्याची कृपा वेळोवेळी तुमच्यावरराहील यामुळे रखडलेली कामे पूर्ण होतील. या कालावधीत तुम्हाला तुमच्या मेहनतीचे यशस्वी परिणाम दिसतील.
शनीच्या या अवस्थेमुळे आर्थिक बाबतीत तुम्हाला लाभ होईल. या कालावधीत धन बचत होईल. यामुळे बँक बॅलन्स वाढेल. जर दीर्घकाळापासून तुम्ही एखादी संपत्ती विकत होतात आणि ती होत नव्हती तर या कालावधीत होईल. तुम्ही कोणतीही संपत्ती खरेदी करू शकता. मकर राशीच्या कुटुंबाच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईळ. प्रेमसंबंधांसाठी ही वेळ चांगली आहे.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…