पुणे : पुण्याच्या कल्याणीनगर भागात अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत कार चालवत दोन तरुणांना चिरडल्याच्या घटनेने (Pune Porsche Accident) अख्खा महाराष्ट्र तापला होता. हा मुलगा पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा असल्याने त्याला वाचवण्यासाठी अख्खी यंत्रणाच कशी कामाला लागली आहे, याची वारंवार उदाहरणे समोर येत होती. त्यातच आता या धनिकपुत्राला मुंबई हायकोर्टाकडून (Mumbai High court) मोठा दिलासा मिळाला आहे. त्याला बालसुधारगृहाच्या कस्टडीतून तात्काळ मुक्त करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. यामागील कारणही समोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जामीनानंतर पुणे पोलिसांनी मुलाला पुन्हा ताब्यात घेणं बेकायदेशीर असल्याचं मुंबई उच्च न्यायलयाने म्हटलं. मुलाची आत्या पूजा जैन हिने काही दिवसांपूर्वी हेबियस कॉर्पसअंतर्गत हायकोर्टात याचिका दाखल केली होती. जामीन मिळाल्यानंतरही पुणे पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने मुलाला डांबून ठेवल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला होता. ही याचिका हायकोर्टाने स्वीकारली असून मुलाला आत्याच्या ताब्यात देण्याचे निर्देश दिले आहेत. मुलाचे आई, वडील आणि आजोबा हे सध्या पोलीसांच्या कोठडीत आहेत. त्यामुळे मुलाला आत्याच्या ताब्यात देण्यात येणार आहे. न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.
कोर्टाने जामीन दिल्यानंतरही मुलाला अटक करण्यात आली. इथे सरळसरळ कायद्याच्या मर्यादेबाहेर जात कोर्टाने अटकेचे आदेश दिले आहेत. मुलगा १७ वर्षे ८ महिन्यांचा आहे, त्यामुळे अल्पवयीनच आहे यात दुमत नाही. सध्या त्याला बालसुधारगृहात ठेवण्यात आलं आहे. तिथे मुलाची नीट काळजी घेतली जात नसून तिथे त्याच्या जीवालाही धोका आहे. बालसुधारगृहाबाबत अनेक तक्रारी आहेत. मुलाचे आई- वडील, आजोबा सारेजण सध्या कोठडीत आहेत. याप्रकरणी दाद मागणाराच कुणी नाही, म्हणून आत्याच्या वतीने ही याचिका करण्यात आली.
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…