चोला मंडळ इन्श्युरन्स कंपनी कडून शेतकऱ्यांची फसवणूक, शेतीचे पंचनामे करून पण नुकसान भरपाई नाही

  99

दोन जुलै पासून उपोषणचा इशारा


पेण(देवा पेरवी )- काही वर्षां पूर्वी पासून मोदी सरकार ने एक रुपायात पिक विम्याची घोषणा केल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले होते. या घोषणेनंतर बळीराजाने चोला मंडळ विमा कंपनीकडून आपल्या शेतीचा २०२३ रोजी विमा उतरविला होता. मागील वर्षात अतीवृष्टी मुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले होते. शेतकर्‍यांनी शेतातील पिकाची कापणी केली असताना अती पावसामुळे पुर्ण पिक वाया जावुन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र चोला मंडळ इन्श्युरन्स कंपनीने शेतीचे रीतसर पंचनामे करून देखील नुकसान भरपाई न देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. येत्या १ जुलै पर्यंत संपूर्ण नुकसान भरपाई न मिळाल्यास 2 जुलै रोजी पासून शेतकरी तीव्र आंदोलन करत उपोषण करणार आहेत.


२०२३ च्या विमा धारक शेतकऱ्यांनी शेतीच्या नुकसानाची रितसर तक्रार चोला मंडळ एम.यस. इन्श्युरन्स कंपनी कडे 24 तासाच्या आत केली होती. त्या नुसार सदर शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे सुद्धा रीतसर झाले होते. परंतु आज पर्यत फक्त २० टक्के शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे जमा झाले तेही तुरळक प्रमाणात शेतकऱ्यांची चेष्टा केल्या प्रमाणे. जर का सरकारने १ रुपयात शेतकऱ्यांना विमा दिला असेल पण सरकारने विमा कंपनीला सर्व शेतकऱ्यांच्या विम्याचे देय रक्कम विमा कंपनीला जमा केले आहेत. मग बळीराजाला नुकसान भरपाई देण्यात चोला मंडळ दिरंगाई का करत आहे.


शेतकऱ्यांने शेतीचा विमा उतरवून एक वर्ष झाले पंरतु आज पर्यत नुकसान भरपाई मिळाली नसल्याने पेण खारेपाट विभागातील बळीराजाने पेण येथील तालुका कृषी अधिकारी सागर वाडकर यांची भेट घेऊन व्यथा मांडली. तसेच येत्या एक तारखे पर्यन्त नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा नाही झाले तर दोन जुलै रोजी पासून कृषी अधिकारी पेण कार्यालया समोर चोला मंडळ एम.एस. इन्श्युरन्स कंपनी विरोधात तीव्र आंदोलन करत उपोषण करणार असल्याचा इशारा संपूर्ण शेतकरी वर्गाने दिला आहे.


raसंबधित चोला मंडळ इन्श्युरन्स कंपनी बरोबर विमा बद्दल पत्र व्यवहार करून तसेच चौकशी करुन व जिल्हा कृषी अधिकारी यांच्याशी बोलुन योग्य तो निर्णय घेतला जाईल. - सागर वाडकर, तालुका कृषी अधिकारी-पेण

Comments
Add Comment

माजी सैनिक रमेश खरमाळे यांना ‘राष्ट्रपती भवन’चे आवतण

पर्यावरण रक्षणासाठी झटणाऱ्या अवलियाच्या कामाची दखल जुन्नर : पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेतलेले जुन्नरचे

Red Soil Stories चे सुप्रसिद्ध यूट्यूबर शिरीष गवस यांचं निधन, वयाच्या ३३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कोकणातील खाद्यसंस्कृती यूट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणारे सुप्रसिद्ध Red Soil Stories चे युट्युबर

गणेशभक्तांचा रेल्वे प्रवास अधिक सुखकर करा!

खा. नारायण राणे यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन विशेष गाड्या,अधिकचे कोच जोडण्याची केली मागणी नवी दिल्ली :

सिंधुदुर्गमध्ये महाराष्ट्राचा पहिला काचेचा पूल सज्ज! नापणे धबधब्यावर पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण, कोकण पर्यटनाला नवी झळाळी

सिंधुदुर्ग: कोकणच्या निसर्गरम्य सिंधुदुर्ग जिल्ह्यात, पर्यटनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारे एक महत्त्वाचे

अभय योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा

आयुक्त मंगेश चितळे यांचे आवाहन पनवेल : मालमत्ता करांवरील शास्तीमध्ये सवलत देत पनवेल महापालिकेने दिनांक १८ जुलै

Reservation Chart : आता ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी पाहायला मिळणार आरक्षण चार्ट, 'या' दिवसापासून सेवा सुरूवात

मुंबई : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अधिक सोयीस्कर सेवा देण्यासाठी आणि त्यांचा प्रवास अधिक चांगल्या पद्धतीने