Raj Thackeray : पुढच्या पिढीने जगायचं कसं? महाराष्ट्राचं काय होणार?

जातीपातीच्या वादावर राज ठाकरे यांचा संतप्त सवाल


मुंबई : राज्यात सध्या मराठा विरुद्ध ओबीसी (Maratha Vs OBC) संघर्ष पेटला आहे. दोन्ही समाजांच्या परस्परविरोधी मागण्यांमुळे राज्य सरकार (State government) कोंडीत सापडलं आहे. सामान्य माणसंच नव्हे तर राजकीय नेतेही या जातीपातीच्या वादावर टोकाची वक्तव्ये करत आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी 'पुढच्या पिढीने जगायचं कसं? महाराष्ट्राचं काय होणार?', असा संतप्त सवाल उपस्थित केला. निवडणुकीच्या दृष्टीकोनातून मनसेच्या पदाधिकाऱ्यांची आज राज ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी राज्यातील जातीय आरक्षणावरून (Caste reservation) सुरू असलेल्या वादावर आपली भूमिका मांडली.


राज ठाकरे म्हणाले, मी इतकी वर्षे सर्व समाजाला सांगतोय, या जातीपातीच्या वादातून काही निष्पन्न होणार नाही. हे सगळे पुढारी जातीपातीत द्वेष पसरवून फक्त मते हातात घेतील. आता लहान लहान मुलं जातीपातीवरून एकमेकांशी बोलतायेत. हे शाळा कॉलेजपर्यंत विष जाईल हे मी आधी सांगितले होते. जातीपातीचं विष कालवणाऱ्या लोकांना महाराष्ट्रानं दूर ठेवलं पाहिजे, असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं.


पुढे ते म्हणाले, जातीय विष महाराष्ट्रात कधीही नव्हते. कितीही आवडणारा पक्ष असेल किंवा नेता असेल पण असं जर ते करणार असतील तर पुढच्या पिढीने जगायचं कसं? महाराष्ट्राचं काय होणार? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. त्याशिवाय ज्याप्रकारे उत्तर प्रदेश, बिहारमध्ये सुरू आहे तसं महाराष्ट्रात यावरून रक्तपात होईल अशी भीती राज ठाकरेंनी वर्तवली.



मराठा-ओबीसी आरक्षणावरून वाद


राज्यात मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील सातत्याने आंदोलन करत आहेत. तर ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे राज्यात सध्या मराठा-ओबीसी आरक्षणाचा वाद चांगलाच पेटला आहे. त्यात जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला १३ जुलैपर्यंतची मुदत दिली आहे.

Comments
Add Comment

देशामध्ये २२ बनावट विद्यापीठे

‘यूजीसी’ने जाहीर केली यादी मुंबई  : मान्यता नसलेल्या विद्यापीठांमुळे दरवर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व

आरटीओ कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण अटळ

मुंबई : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आकृतीबंधाची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करावी. सर्व रिक्त पदांवर

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

'आयुष'च्या ४२८५ रिक्त जागा, होमिओपथी, आयुर्वेद, युनानी अभ्यासक्रमांचे प्रवेश

महाराष्ट्र : आरोग्यविज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सरकारी आणि खासगी महाविद्यालयांकडून राबवण्यात

शिक्षक होण्याची सुवर्णसंधी, CTETची अधिसूचना जाहीर

मुंबई : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या वेळापत्रकानुसार केंद्रीय शिक्षक पात्रता