Vande Bharat : मुंबई-गोवा वंदे भारतला पावसाचा फटका!

आठवड्यातून सहा वेळा धावणारी वंदे भारत फक्त तीन दिवस धावणार


मुंबई : मुंबई-गोवा दरम्यानच्या जलद प्रवासासाठी मध्य आणि कोकण रेल्वेवरून मुंबई–गोवा वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat) चालवण्यात येत आहेत. परंतु, पावसाळ्यात मुंबई–गोवा वंदे भारत एक्स्प्रेसच्या (Vande Bharat Express) अप आणि डाऊन १२४ फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांचा हिरमोड झाला आहे.


रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोकण रेल्वेवर १० जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. पावसाळ्यात या मार्गावरील दृश्यमानता कमी झाल्याने आपत्कालीन घटना होऊ नये यासाठी रेल्वेगाड्यांचा वेग कमी केला जातो. त्यामुळे बहुतांश रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात येतो. याचा सर्वाधिक फटका अति जलद रेल्वेगाड्यांना बसतो. यात वंदे भारत एक्स्प्रेसचाही समावेश आहे. आठवड्यातून सहा वेळा धावणारी वंदे भारत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त तीन दिवस धावणार आहे.


गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. तसेच पावसाळ्यात मुंबई–गोवा दरम्यानचे निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक वंदे भारतमधून प्रवास करणे पसंत करतात. मात्र, जून–ऑक्टोबर कालावधीत मुंबई–गोवा वंदे भारतच्या १२४ फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून यादरम्यान प्रवाशांना वंदे भारत एक्स्प्रेसमधून प्रवास करणे अवघड होणार आहे.


पावसाळी वेळापत्रक लागू केल्याने काही रेल्वेगाड्यांच्या फेऱ्यांमध्ये कपात करण्यात आली आहे. यात वंदे भारत एक्स्प्रेसचा समावेश आहे. सकाळी सीएसएमटीवरून वंदे भारत एक्स्प्रेसचा एक रेक दुपारी मडगावला पोहचतो. त्यानंतर हाच रेक सीएसएमटीला पाठविण्यात येतो. मात्र, पावसाळ्यात रेल्वे गाड्यांचा वेग कमी झाल्याने वंदे भारत एक्स्प्रेसचा रेक टर्मिनसवर वेळेत पोहचत नाही. त्यामुळे परतीचा प्रवास करताना दुसऱ्या डब्याची आवश्यकता आहे. परंतु, रेक नसल्याने वंदे भारत आठवड्यातून तीन वेळा चालवण्यात येणार आहे. यासह जादा रेक उभा करण्यासाठी सीएसएमटी येथे जागेचा अभाव आहे, असे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले.


कोकण रेल्वेच्या पावसाळी वेळापत्रकामुळे पावसाळ्यात वंदे भारत एक्स्प्रेस आठवड्यातील सहाऐवजी तीन दिवस धावत असल्याचे डॉ. स्वप्निल निला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे यांनी सांगितले.


पावसाळी वेळापत्रकानुसार मुंबई–गोवा दरम्यानचे सुमारे ५८६ किमी अंतर कापण्यासाठी वंदे भारत एक्स्प्रेसला ८ ते १० तास लागतात. गाडी क्रमांक २२२२९ सीएसएमटी – मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी पहाटे ५.२५ वाजता सीएसएमटीवरून सुटते आणि मडगाव येथे दुपारी ३.३० वाजता पोहचते. तर गाडी क्रमांक २२२३० मडगाववरून दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी दुपारी १२.२० वाजता सुटते आणि रात्री १०.२५ वाजता सीएसएमटी मुंबईला पोहचते.

Comments
Add Comment

कोकणाच्या विकासासाठी भाजपचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; जयगड बंदर बनणार अर्थव्यवस्थेचं केंद्र

रत्नागिरी: मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे

रत्नागिरी नाचणेत मुलाकडून आईचा खून, खून करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

गणेशोत्सवाच्या उत्साहात रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. शहरातील नाचणे येथे पोटच्या मुलाने आपल्या आईचा निर्घृण

खेडमधील खवटी गावाजवळ खासगी बस आणि कारचा भीषण अपघात, तिघेजण गंभीर जखमी

खेडमधील खवटी गावाजवळ मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास खासगी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात