युक्रेन शांतता करारावर भारताने नाकारली स्वाक्षरी

संयुक्त निवेदनाला मान्यता


नवी दिल्ली : युक्रेनमधील शांततेसाठी स्वित्झर्लंडने आयोजित केलेल्या शिखर परिषदेत भारतासह काही देशांनी संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी नाकारली. भारताने रशिया आणि युक्रेनमधील संघर्षाच्या शांततापूर्ण निराकरणासाठी 'प्रामाणिक आणि व्यावहारिक भागीदारीची मागणी केली. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील सचिव (पश्चिम) पवन कपूर यांनी बर्गनस्टॉकच्या स्विस रिसॉर्टमध्ये आयोजित शिखर परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व केले, ज्यामध्ये अनेक राष्ट्रप्रमुखांसह १०० पेक्षा अधिक देश आणि संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. शिखर परिषदेतून जारी केलेल्या कोणत्याही संभाषण किंवा दस्तावेजापासून भारताने स्वतःला दूर ठेवले. आपल्या संक्षिप्त भाषणात, भारताचे वरिष्ठ मुत्सद्दी म्हणाले की, शांतता शिखर परिषदेत भारताचा सहभाग आणि युक्रेनच्या शांतता सूत्रावर आधारित वरिष्ठ अधिकाèऱ्यांच्या अनेक बैठका आम्ही स्पष्ट केले आहे की, चिरस्थायी शांतता केवळ संवाद आणि मुत्सद्देगिरीनेच साध्य केली जाऊ शकते.


समारोप झालेल्या शिखर परिषदेचा मुख्य उद्देश भविष्यातील शांतता प्रक्रीयेला प्रेरणा देणे हा होता. रशियाला या परिषदेसाठी आमंत्रित करण्यात आले नव्हते, तर चीनने उपस्थित न राहणे पसंत केले. भारती शिष्टमंडळ शिखर परिषदेच्या उद्घाटन आणि समारोपाच्या पूर्ण सत्रात सहभागी झाले होते. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, भारताने या शिखर परिषदेतून जारी केलेल्या कोणत्याही संभाषण किंवा दस्तऐवजाशी स्वतःला जोडलेले नाही. परिषदेतील भारताचा सहभाग तसेच युक्रेनच्या शांतता सूत्रावर आधारित मागील एनएसए किंवा राजकीय संचालक स्तरावरील बैठकींमधील सहभाग, संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून संघर्षाचे चिरस्थायी आणि शांततापूर्ण निराकरण करण्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. स्वित्झर्लंडच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले की, ८३ देश आणि संघटनांनी 'युक्रेनमधील शांततेवरील उच्चस्तरीय परिषदेच्या शेवटी संयुक्त निवेदनाला मान्यता दिली आहे.

Comments
Add Comment

Operation White Hammer : आंध्र प्रदेशात ४७ कोटींचे अंमली पदार्थ जप्त; दोघांना अटक

सिंथेटिक ड्रग्जच्या बेकायदेशीर उत्पादनाविरोधात महत्त्वपूर्ण कारवाई करत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय)

फास्टॅग वार्षिक पास १ एप्रिलपासून महाग होणार

नवी दिल्ली : पुढील महिन्यापासून म्हणजेच १ एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना थोडा

युद्धामुळे महागणार विमान प्रवास?

नवी दिल्ली : मध्य पूर्वेतील तणावाचे चटके आता विमान प्रवासालाही बसणार आहेत. इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात

Dharmantar Bandi Kayda : सावधान! बळजबरीने किंवा आमिषाने धर्मांतर केल्यास...राज्य सरकारचा धर्मांतर बंदी कायद्याचा नवा प्रस्ताव सादर

मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यातील सक्तीच्या आणि फसव्या धर्मांतरांना लगाम घालण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे.

भारताच्या जहाजांना धोका नाही

इराणकडून मैत्रीचा हात पुढे नवी दिल्ली : पश्चिम आशियात इराण-इस्रायल तणावामुळे जागतिक सागरी व्यापार धोक्यात आला

इराण युद्धामुळे भरपूर नफा ?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा नवी दिल्ली  : ज्या देशांमध्ये युद्ध होते, त्यांचे अतोनात