Vidhanparishad Election : विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर!

Share

कधी होणार मतदान?

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) धामधुमीनंतर अवघ्या राज्याचे लक्ष विधानपरिषद निवडणुकांकडे (Vidhanparishad Election) लागले होते. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक आयोग (Election Commission) कधी निवडणूक घोषित करणार याची सर्वजण वाट पाहत होते. राजकीय पक्षांनी या जागांसाठी उमेदवारांची चाचपणी देखील सुरु केली. यानंतर अखेर ११ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून त्याचे वेळापत्रक समोर आले आहे.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार पुढील वेळापत्रक असणार आहे,

२५ जून – निवडणूक आयोगाकडून अधिसचूना जारी केली जाईल.
२ जुलै – उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख.
३ जुलै – अर्जांची छानणी केली जाईल.
५ जुलै – उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख.
१२ जुलै – मतदान पार पडेल व त्याच दिवशी निकाल जाहीर होईल.

१२ जुलै रोजी या निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान होईल. सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत यासाठी मतदान करता येईल. १२ जुलै रोजीच मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे.

कोणते आमदार होणार निवृत्त?

विधानसभेच्या आमदारांनी मतदानाच्या माध्यमातून नियुक्त केलेल्या विधानपरिषदेच्या ११ आमदारांचा कार्यकाळ येत्या २७ जुलै रोजी संपणार आहे. त्यामुळे त्यांच्या जागेवर अन्य व्यक्तींची आमदार म्हणून निवड केली जाईल. २७ जुलै रोजी कार्यकाळ संपणाऱ्या आमदारांमध्ये विजय गिरकर, निलय नाईक, रमेश पाटील, रामराव पाटील (भाजप), महादेव जानकर (भाजप मित्र पक्ष), अनिल परब (शिवसेना ठाकरे गट), मनीषा कायंदे (शिवसेना शिंदे गट), डॉ. वजाहत मिर्झा व डॉ. प्रज्ञा सातव (काँग्रेस), बाबाजानी दुराणी (राष्ट्रवादी), जयंत पाटील (शेकाप) या ११ आमदारांचा समावेश आहे.

Recent Posts

साहित्यभूषण पुरस्कारासाठी आता दहा लाख रुपये देणार : उदय सामंत

रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…

33 minutes ago

मुख्यमंत्री सचिवालयात लवकरच पीजीआरएस प्रणाली

नागपूर:  विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…

1 hour ago

नॅशनल पार्कमधील मिनी ट्रेन सुरू होणार

बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…

1 hour ago

मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात ६२६ अर्ज

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…

2 hours ago

‘प्रधानमंत्री जनधन योजना’चे अभूतपूर्व जागतिक यश!

प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…

8 hours ago

ट्रम्प टॅरिफ अनर्थ…

उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…

8 hours ago