Sunetra Pawar : ना प्रफुल पटेल, ना सुनील तटकरे! केंद्रात मंत्रीपदासाठी 'वहिनीं'ची लागणार वर्णी?

राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार केंद्रात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण


मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटाचा (NCP Ajit Pawar group) महाराष्ट्रातून केवळ एक खासदार निवडून आल्यामुळे केंद्रात राष्ट्रवादीला मंत्रीपद मिळणार नसल्याची शक्यता होती. अजित पवार यांनी दिल्लीत ठाण मांडूनही दिलासा मिळाला नव्हता. मात्र, राज्यसभेतून प्रफुल पटेल (Praful Patel) हे राष्ट्रवादीचे खासदार असल्याने एक मंत्रीपद अजितदादांना मिळू शकते, अशा चर्चा होत्या. त्यातच आता प्रफुल पटेल यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी राष्ट्रवादीकडून ज्या व्यक्तीची वर्णी लागेल त्यालाच केंद्रात मंत्रीपद देखील मिळणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचं नाव पुढे आलं आहे.


प्रफुल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे राज्यसभेच्या रिक्त जागेवर कोणाची वर्णी लागणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. या जागेसाठी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित मानलं जात आहे. तसेच सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर वर्णी लागल्यानंतर मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती आहे. सुनेत्रा पवार या आज राज्यसभेसाठी अर्ज भरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या राज्यसभेच्या जागेसाठी सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे या जागेवर कोणाला उमेदवारी मिळणार, हे दुपारी बारा वाजल्यानंतर स्पष्ट होणार आहे.


राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख आहे. काही दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांनी पत्र लिहून सुनेत्रा पवार यांना राज्यसभेत पाठवण्याची मागणी केली होती. दरम्यान, सुनेत्रा पवार यांना मंत्रिपदाच्या मिळाल्यास प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

खोकल्याच्या सिरपमुळे बालकांचा मृत्यू; खबरदारीसाठी राज्याने 'हा' टोल-फ्री क्रमांक केला जारी!

मुंबई: मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशातील काही राज्यांमध्ये 'कोल्ड्रिफ' (Coldrif) नावाच्या खोकल्याच्या सिरपमुळे काही

लाडक्या बहिणींची 'ई केवायसी'तील तांत्रिक अडचण लवकर दूर करणार, मंत्री आदिती तटकरेंचे आश्वासन

मुंबई(प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता 'ई-केवायसी' बंधनकारक केली आहे.

ठाकरे बंधूंची मात्रोश्रीवर भेट, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शिवसेना

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय,

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात