Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित! सरकारला दिला एक महिन्याचा अवधी

म्हणाले, एका महिन्यात मागण्या मान्य झाल्या नाही तर विधानसभा निवडणुकीत...


जालना : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषण करणारे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) निकालानंतर पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली होती. मराठा आरक्षणात सगेसोयरेंच्या मागणीची अंमलबजावणी करण्यात यावी, यासाठी त्यांनी पुन्हा उपोषण सुरु केले होते. दरम्यान, आज सरकारचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटी (Antarwali sarati) येथे जाऊन जरांगेंना भेटल्याने सहाव्या दिवशी त्यांनी उपोषणाला स्थगिती दिली आहे. मात्र, यावेळेस त्यांनी सरकारला एक कडक इशारा दिला आहे.


सरकारचे प्रतिनिधी म्हणून आज कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या भेट घेतली. यावेळी सरकारने जरांगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी एक महिन्याचा वेळ मागितला, तो जरांगेंनी मान्य केला आहे. जरांगे पाटील यांनी आधी सरकारला जे काही कारायचे आहे ते ३० जूनच्या आधी करावे, असे म्हटले होते. मात्र, शंभूराज देसाईंनी समजूत काढल्यानंतर जरांगे पाटील सरकारला मागण्या पूर्ण करण्यासाठी एक महिन्याचा वेळ देण्यास तयार झाले आहेत.



सरकारला दिला कडक इशारा


या भेटीवेळी जरांगे पाटील यांनी सरकारला इशाराही दिला आहे. ते म्हणाले, 'जर एका महिन्यात मराठा आरक्षणाच्या संदर्भातील मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही विधानसभेच्या निवडणुकीत उतरू'. त्यामुळे आता सरकार नेमके काय प्रयत्न करणार आणि महिन्याभरात जरांगेंच्या मागण्या पूर्ण होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


Comments
Add Comment

ताडोबा व्याघ्र प्रकल्प परिसरातील ८०० एकर जागेचे होणार पर्यावरणीय पुनरुज्जीवन

मुंबई : विदर्भातील विविध विकास कामांबरोबरच तेथील जंगल संपदा राखण्यासाठी व त्याच्या वाढीसाठी मुख्यमंत्री

नागपूरमध्ये अतिविशेषोपचार वैद्यकीय अभ्यासक्रमांसह ६१५ खाटांचे रुग्णालय

नागपूर : नागपूर येथे वैद्यकीय उपचाराच्या दर्जेदार सुविधा रुग्णांना उपलब्ध व्हाव्यात आणि वैद्यकीय

शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी एसटीची हेल्पलाईन

धाराशिव (प्रतिनिधी) - शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी - विद्यार्थिनींना घरातून शाळेला जाताना अथवा शाळेतून घरी

Dharashiv Accident : सोलापूर-हैदराबाद महामार्गावर क्रुझरचा भीषण अपघात; धाराशिवमध्ये ५ जणांचा जागीच मृत्यू

धाराशिव : सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर धाराशिव जिल्ह्यात आज शनिवारी (२२ नोव्हेंबर २०२५) सकाळी एक भीषण

Nashik Ring Road : नाशिककरांना 'ट्रॅफिक जॅम' मधून मुक्ती! ६६ किमी लांबीचा रिंग रोड कसा असेल? ८,००० कोटींचा प्रोजेक्ट पूर्ण आराखडा!

नाशिक : नाशिक शहराचा जसजसा विकास झाला, तसतशी शहरात वाहतूककोंडीची समस्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या

Dondaicha Nagar parishad Election : ७३ वर्षांचा इतिहास मोडला! दोंडाईचा नगर परिषद पहिल्यांदाच बिनविरोध; रावल यांनी कोणते 'गुप्त राजकारण' केले?

धुळे : राज्याचे पणन व राज शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल (Jaykumar Rawal) यांनी धुळे (Dhule News) जिल्ह्यातील राजकारणात एक नवा