पुणे : पुण्यातील पोर्शे कार अपघाताची देशभरात चर्चा सुरु आहे. या प्रकरणाबाबत नवनवीन उलगडे समोर येत असताना अल्पवयीन मुलाच्या सुनावणीदरम्यान पोलिसांनी कोर्टात मोठा दावा केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला तपासादरम्यान सोडल्यास इतर नातेवाईकांच्या मदतीने पुराव्यांशी छेडछाड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा परिणाम तपासावर होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर बाल सुधारगृहात मुलाचे समुपदेशन सुरु आहे. ते पुर्ण व्हायचे बाकी आहे. त्यासाठी त्याला बाल सुधारगृहातच ठेवण्याची मागणी पोलिसांनी केली होती.
पोलिसांच्या मागणीनुसार कोर्टाने आरोपीच्या कोठडीत आणखी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बाळ न्याय मंडळाने अल्पवयीन आरोपीची १३ दिवसांनी रिमांड वाढवली असून, त्याला २५ जूनपर्यंत निरीक्षणगृहात ठेवण्यात येणार आहे.