नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या कॅबिनेटमध्ये यंदा ७१ मंत्र्यांचा समावेश आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे. राष्ट्रीय हित आणि सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेणाऱ्या सुरक्षा मंत्रिमंडलीय समितीशी निगडित सर्व खाती भाजपाने स्वत:कडे ठेवली आहेत. इतकेच नाही तर नरेंद्र मोदी यांनी पुन्हा त्यांच्या विश्वसनीय टीमकडेच ही मंत्रालये सोपवली आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळात मोठे निर्णय घेतले जातील, असे सांगत आहेत. मागील १० वर्षे फक्त ट्रेलर होता असे ते म्हणतात. नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक मंत्र्यांना खातेवाटप केले आहे. त्यात संरक्षण, गृह, परराष्ट्र आणि अर्थ यासारखी हायप्रोफाईल खाती भाजपाकडेच ठेवली आहेत. त्यासोबतच आरोग्य, परिवहन, शिक्षण, ऊर्जा, शहरी विकास, कृषी, वाणिज्य उद्योग, दूरसंचार, पर्यावरण, पर्यटन, महिला व बालविकास, रोजगार, जलशक्ती मंत्रालय हेदेखील भाजपाकडे आहे.
अटलबिहारी वाजपेयी यांच्या कारकिर्दीत एनडीए सरकारमध्ये ही खाती घटक पक्षांना दिली होती. २०१४ ते २०१९ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीएच्या सरकारमध्ये चारही मंत्रालये भाजपाकडे होती. कारण पक्षाकडे बहुमत होते.
यंदाच्या निकालात भाजपाची परिस्थिती पाहता या ४ पैकी एखाद दुसरे खाते तेलुगू देसम पार्टी अथवा जनता दल युनायटेडला मिळेल असे बोलले जात होते.
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…