Viral Video: आजकाल सोशल मिडियावर काय व्हायरल होईल सांगता येत नाही. सध्या एक मृतदेह पाण्यावर तरंगत असतानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ दक्षिण भारतातील असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओमध्ये एक मृतदेह पाण्यात तरंगत असल्याचे दिसते. त्याला बाहेर खेचण्यासाठी पोलिसदेखील तेथे येतात. पोलिसांनी त्याचा हात धरुन त्याला बाहेर खेचण्याचा प्रयत्न करताच, तो व्यक्ती जागा होतो. तेथे उपस्थित असलेल्या गर्दीत हश्या पिकतो. पोलिसांनी पाण्यात असं पडुन राहण्यावरुन प्रश्न केले असता, त्या व्यक्तीने उष्णतेचे कारण दिले. पहा व्हिडिओ...