Saturday, April 19, 2025
Homeदेशराष्ट्रपतींकडून नरेंद्र मोदींना सरकार स्थापनेसाठी निमंत्रण, ९ जूनला होणार शपथविधी

राष्ट्रपतींकडून नरेंद्र मोदींना सरकार स्थापनेसाठी निमंत्रण, ९ जूनला होणार शपथविधी

नवी दिल्ली:देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदी(narendra modi) यांना ९ जून २०१४ला संध्याकाळी सव्वा सात वाजता राष्ट्रपती भवनात पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिपरिषदेच्या अन्य सदस्यांना पद आणि गोपनीयतेच्या शपथेसाठी निमंत्रण दिले आहे. राष्ट्रपतींना एनडीच्या नेत्यांचे समर्थन पत्र मिळाले त्यानंतर १८व्या लोकसभेत एनडीला बहुमत मिळणार असल्याची स्थिती आहे.

 

राष्ट्रपतींनी नरेंद्र मोदींना सांगितले की राष्ट्रपती भवनात आयोजित होणाऱ्या शपथ ग्रहण सोहळ्याची तारीख आणि वेळ सांगा. सोबतच केंद्रीय मंत्रिपरिषदेच्या सदस्यांच्या रूपात नियुक्त केल्या जाणाऱ्या इतर नेत्यांच्या नावांची यादीही मागवली आहे.

एनडीए गठबंधनचे नेते म्हणून निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्या घरी भेट घेतली. यानंतर मोदींनी राष्ट्रपतींची भेट घेत त्यांना आपल्या समर्थक खासदारांची यादी सोपवली आणि सरकार बनवण्याचा दावा केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -