Accident : बुलढाण्यात भरधाव खासगी बसचा भीषण अपघात!

Share

१७ प्रवासी गंभीर जखमी

बुलढाणा : बुलढाण्यामधून (Buldhana Accident) एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागपूरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या खाजगी प्रवासी बसचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये १७ प्रवासी गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या मुंबई नागपूर मार्गावर सावखेड फाटा परिसरात आज ही दुर्घटना घडली. पुणे ते मानोरा येथे जाणाऱ्या चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या बस चालकाचे नियंत्रण सुटून ही खासगी बस रस्त्याच्या कडेला उलटली. या भीषण अपघातादरम्यान १७ प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर सिंदखेडराजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या जखमींमध्ये यवतमाळ, वाशीम व बुलढाणा जिल्ह्यातील रहिवाशांचा समावेश आहे.

दरम्यान, ट्रॅव्हल्स बस डाव्या बाजूने उलटल्याने प्रवासी किमान एक तास अपघातग्रस्त बसमध्ये अडकून पडले होते, अशी माहिती मिळत आहे.

या अपघातात जखमी झालेल्यांची यादी समोर आली आहे

  • योगेश गणेश शेंदुरकर २५ वर्ष, रा. कोठारी तालुका मंगरूळपीर जिल्हा वाशिम
  • दिनेश मधुकर राठोड वय २४ वर्ष रा. पिंपळखुटा तालुका दारवा जिल्हा यवतमाळ
  • संदीप बाबू सिंग राठोड वय ३१ वर्षे रा. पिंपळगाव, तालुका दारवा जिल्हा यवतमाळ
  • प्रीतम संतोष पडघान २४ वर्ष राहणार आडोळी, तालुका जिल्हा वाशिम
  • अंकुश प्रल्हाद पोहाणे राहणार कवठळ, तालुका मंगरूळपीर ,जिल्हा वाशिम
  • सुनील मोहन पवार राहणार वार्डा खेरडा, तालुका मानोरा, जिल्हा वाशिम
  • वैष्णवी पुरुषोत्तम अंभोरे १९ वर्ष, राहणार सावरखेड तालुका बार्शीटाकळी जिल्हा अकोला
  • उज्वल पुरुषोत्तम अंभोरे सोळा वर्ष राहणार सावरखेड, तालुका बार्शीटाकळी, जिल्हा अकोला
  • सौरव विजय पोले वय २१ वर्ष राहणार शिवनी, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ
  • सुरेश मानसिंग जाधव ४७ वर्ष, राहणार भोईनी, तालुका मानोरा जिल्हा वाशिम
  • स्वराज राम राठोड वय ३ वर्ष राहणार सावरगाव, तालुका मानोरा, जिल्हा वाशिम
  • सदाशिव विष्णू निकष वय ३४ वर्ष राहणार सावत्रा, तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा
  • प्रतीक्षा सदाशिव निकष २८ वर्ष, राहणार सावत्रा, तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा
  • सरस्वती गजानन गायकवाड वय ३७ वर्ष राहणार वाशिम
  • मिना भारत कांबळे ,वय ५०वर्ष राहणार वाशिम
  • अविनाश भिमराव मोरे राहणार शहापूर तालुका जिल्हा वाशिम
  • दिपाली अविनाश मोरे वय २६ वर्ष राहणार शहापूर, तालुका जिल्हा वाशिम.

Recent Posts

World Book Day : भूतकाळासह भविष्यकाळातील दुवा म्हणजेच ‘पुस्तकं’

मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…

1 hour ago

‘टीनएजर्सच्या पालकांकडून अपेक्षा’

डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…

1 hour ago

समाजवादी विचारवंत ना. ग. गोरे

सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…

2 hours ago

राखी वटवट्या

डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…

2 hours ago

“ठाऊक आहे का तूज काही?”

श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…

2 hours ago

साहित्य म्हणजे नेमकं काय ?

गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…

2 hours ago