मुंबई: रिअलमी कंपनीने Realme C63 लाँच केला आहे. कंपनीचा लेटेस्ट बजेट फोनमध्ये Unisoc T612 चिपसेट आहे तसेच ८ जीबी पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळते. या फोनची खास बाब म्हणजे बजेट रेंजमध्ये 45W SuperVOOC चार्जिंग सपोर्ट आणि ५० मेगापिक्सेल कॅमेरा आहे.
ड्युअल सिमचा Realme C63 अँड्रॉईड १४ बेस्ट Realme UI 5 वर काम करतो. यात 90Hzचा रिफ्रेश रेट, 450nits चा पीक ब्राईटनेस, 90.3% स्क्रीन-टू-बॉडी सोबत 6.74-इंच HD+ (1,600×720पिक्सेल डिस्प्ले मिळतो.
यात ५० मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा, एक ड्युअल रेयर कॅमेरा देण्यात आला आहे. तर फोनच्या फ्रंटमद्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ८ मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. या नव्या फोनमध्ये २५६ जीबीपर्यंत इंटरनल स्टोरेज मिळतो.
Realme C63 45W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की एक मिनिटाच्या चार्जिंगमध्ये एक तासापर्यंत टॉकटाईम देऊ शकते. तसेच असेही म्हटले जात आहे की फोनची बॅटरी एकदा चार्ज केल्यास ३८ दिवसांपर्यंत स्टँडबायचा टाईम देते.
दरम्यान, हा फोन इंडोनेशियामध्ये सादर करण्यात आल आहे. मात्र तेथून भारतीय किंमतीचा अंदाज लावता येऊ शकतो. Realme C63 ची किंमत 6GB रॅम + 128GB स्टोरेज मॉडेलसह IDR 1,999,000 रूपये म्हणजे साधारण १० हजार रूपये, 8GB रॅम + 128GB स्टोरेज मॉडल ची कीमत IDR 2,299,9000 म्हणजे साधारण १२ हजार रूपये आहे. रिअल मीने हा नवा फोन लेदर ब्लू आणि जेड ग्रीन रंगामध्ये उपलब्ध आहे.