Loksabha election 2024: राज ठाकरेंची सभा आणि उमेदवार विजयी

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे(loksabha election 2024) अपडेट हाती आले आहे. दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत भाजपला मात्र मोठा धक्का बसला आहे. त्यांना स्पष्ट बहुमत दिसत नाही आहे. दरम्यान, महाराष्ट्रातही धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीने महायुतीला मागे टाकत आघाडी घेतली आहे.


महाराष्ट्रातील यंदाची निवडणूक रंगतदार ठरली होती. दोन्ही पक्षांमधील फुटीमुळे खरतर ही निवडणूक महत्त्वाची होती. त्यातच लोकसभेच्या प्रचारासाठी महायुतीसाठी राज ठाकरेंनी प्रचार केला होता. राज ठाकरेंचा हात खरंतर परिस स्पर्श ठरला आहे.


राज ठाकरेंनी महायुतीच्या ज्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतल्या त्या सर्वच उमेदवारांनी या निवडणुकीत विजय मिळवला आहे. राज ठाकरे यांनी पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ सभा घेतली होती. ते मुरलीधर मोहोळ त्यांच्या मतदारसंघातून विजयी झाले आहेत.


दुसरीकडे राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवली मतदारसंघाचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासाठी प्रचारसभा घेतली होती. त्यानंतर डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही आपल्या मतदारसंघातून हॅटट्रिक मारली आहे. ते तिसऱ्यांदा या मतदारसंघातून निवडून आले आहेत.


तसेच राज ठाकरेंनी भाजपचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचारासाठीही कणकवलीत सभा घेतली होती. या मतदारसंघातही नारायण राणे यांनी विजय मिळवला आहे. नारायण राणे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून विजय मिळवला आहे.

Comments
Add Comment

Chhatrapati Sambhaji Nagar : गाझा मदतीच्या नावाखाली देशाच्या सुरक्षेशी खेळ? QRने गोळा केलेले लाखो रुपये थेट परदेशात; एटीएसकडून एकाला अटक, काय घडतंय नेमकं?

छत्रपती संभाजी नगर : गाझा-पॅलेस्टाईन येथे सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांच्या मदतीच्या

स्थानिक निवडणुकांतून ‘पिपाणी’ वगळली

केंद्रीय निवडणूक आयोगाचा शरद पवारांना दिलासा मुंबई  : शरद पवारांना केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी मोठा

एक कोटी लाडक्या बहिणींकडून केवायसी पूर्ण

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी प्रक्रिया १८ नोव्हेंबरपर्यंत

मुलं आणि शिक्षकांच्या मनाचा ठाव घेईल हे बालदिनाचे प्रभावी भाषण

दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस भारतभर “बालदिन” म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस आपल्या देशाचे

नवले पुलावर भीषण अपघात, तीन वाहनांनी घेतला पेट, सात जणांचा मृत्यू!

चालत्या कंटेनरने अचानक ब्रेक दाबला, भरधाव कार मागून धडकली, कारच्या मागून दुसरा कंटेनर घुसला पुणे : पुणे शहरात

आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात सुरू झाली 'सोलर शाळा'

गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आणि अंबानी उद्योग समूहातील सदस्य आणि ‘रोझी ब्लू