Kangana Ranaut : कंगनाच ठरली मंडीची क्वीन!

दणदणीत विजय मिळवत कंगनाने विरोधकांना लगावले टोले


मंडी : बॉलिवूडमधून विविधांगी भूमिका साकारत तब्बल तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेली अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिने यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) राजकारणाकडे आपला मोर्चा वळवला. इतकंच नव्हे तर कंगनाने भाजपाकडून (BJP) हिमाचलच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून (Mandi Loksabha) खासदारकीचं तिकीट मिळवत विजय पक्का केला आहे. राजकारणाकडे वळू नकोस असा सल्ला कंगनाला देणार्‍यांसाठी कंगनाचा विजय ही सणसणीत चपराक आहे.


तिकीट मिळाल्यानंतर कंगनाने संपूर्ण लक्ष राजकारणावर केंद्रित करत मंडीमध्ये जोरदार प्रचाराला सुरुवात केली होती. त्याचाच परिणाम म्हणून काँग्रेस नेते विक्रमादित्य सिंह यांचा ७० हजारांहून अधिक मतांनी पराभव करत कंगना विजयी झाली आहे.


कंगना रनौत विजयानंतर विरोधी नेते विक्रमादित्य यांना उद्देशून म्हणाली की, 'आता स्वस्तात बोलण्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. एका महिलेबद्दल अशा निरर्थक गोष्टी बोलणे, मुलींचा केलेला अपमान मंडीतील जनेतला पटलेला नाही. आज मंडीतून भारतीय जनता पक्षाला ज्या प्रकारे आघाडी मिळाली आहे, त्यातून हे दिसत आहे. माझ्या मुंबईला जाण्यावर सवाल उठवतात, पण आता हीच माझी जन्मभूमी आहे आणि तिच्या सेवेसाठी मी कायम तत्पर राहीन. जसे मोदीजींचे स्वप्न आहे. सर्वजण मिळून विकास करू शकतात. त्यांची सेना म्हणून काम करेन, असे मी नेहमीच म्हटले आहे. त्यामुळे मी कुठेही जात नाही. कदाचित दुसऱ्याला त्यांची बॅग पॅक करून कुठेतरी जाण्याची गरज आहे', असा टोलाही कंगनाने लगावला.



कंगनाने ट्विट करत मानले मंडीवासियांचे आभार


कंगनाने सोशल मीडिया एक्स अकाऊंटवर एक पोस्ट करत मंडीवासियांचे आभार मानले आहेत. तिने म्हटले आहे की, मंडीतील सर्व लोकांनो, तुमच्या प्रेम आणि विश्वासाबद्दल धन्यवाद! हा तुम्हा सर्वांचा विजय आहे, हा पंतप्रधान मोदीजी आणि भाजपवरील विश्वासाचा विजय आहे, हा सनातनचा विजय आहे, हा जनतेच्या आदराचा विजय आहे, असं कंगनाने म्हटलं आहे.


Comments
Add Comment

स्मशानभूमीत जळत्या चितेशेजारी मुलांचा अभ्यास

अनोख्या शाळेची देशभरात चर्चा बिहार : सर्वसाधारणपणे शाळा म्हटलं की वर्ग येतात, कॅन्टीन असतं, मुलांना खेळायला

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याकडून भाजप, आरएसएसचे कौतुक!

जुना फोटो शेअर करत म्हणाले, ‘हीच संघटनेची शक्ती…’ नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार

देशात मल्टी-डोअर न्यायालये असावीत, विवादांची सुनावणी नको, ते सोडवावेत

गोव्यात 'मध्यस्थी' विषयावर राष्ट्रीय परिषद संपन्न पणजी : मध्यस्थता कायद्याच्या दुर्बळतेचे लक्षण नाही, तर तो

रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमात बदल; आधार लिंक अनिवार्य

सणासुदीच्या काळात दलालांच्या गैरप्रकारांना आळा नवी दिल्ली : भारतीय रेल्वेची कन्फर्म तिकिटे मिळवणे म्हणजे जणू

गिग वर्करचा बुधवारी देशव्यापी संप

ऑनलाइन डिलिव्हरी सेवांवर परिणाम होण्याची शक्यता नवी दिल्ली : नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांनी केलेल्या

नीट-जेईईत फसवणुकीला आळा बसणार

२०२६ पासून ‘चेहरेपट्टीची ओळख’ बंधनकारक नवी दिल्ली : देशातील सर्वाधिक महत्त्वाच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश