Vidhan Parishad Elections : विधानपरिषदेसाठी भाजपकडून तीन जागांवर उमेदवार जाहीर!

  84

कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि मुंबई पदवीधर जागांचा समावेश


मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) धामधुमीतच महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या (Vidhan parishad) ४ जागांसाठी निवडणुकांचा घाट घालण्यात आला आहे. यासाठी २६ जून रोजी मतदान पार पडणार आहे, तर १ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीकरता कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि मुंबई पदवीधर जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत.

भाजपाने कोकण विभाग पदवीधरसाठी निरंजन वाडखरे, मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी किरण रविंद्र शेलार आणि मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिवनाथ हिरामन दराडे यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने पत्रक काढून यासंदर्भातील माहिती दिली आहे.


विधानपरिषदेच्या चार जागांमध्ये दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदारसंघांसाठी ही निवडणूक होत आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर मतदार संघ, तर नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदार संघात ही निवडणूक होणार आहे. ७ जुलै २०२४ रोजी मुंबई पदवीधर मतदारसंघाचे आमदार विलास पोतनीस, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, नाशिक शिक्षक मतदारसंघाचे आमदार किशोर दराडे तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार कपिल पाटील यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे या चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

म्हाडा नाशिक मंडळातर्फे ४७८ सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर

ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रियेला सुरुवात मुंबई : नाशिकमध्ये घर शोधत असणाऱ्यांना आता सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

भंडाऱ्यातलं जेवणं पडलं महागात, संपूर्ण गावाला विषबाधा!

नंदुरबार: नंदुरबार तालुक्यातील भिलाईपाडा या गावातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. सध्या सणा सुदीचा काळ असून

दुबईतील साईभक्ताकडून तब्बल १ कोटी ५८ लाखांचे सुवर्ण दान; सोन्यात घडवली ॐ साई राम अक्षरे

अहिल्यानगर : शिर्डी साई बाबांना हैदराबादमधील आदीनारायण रेड्डी यांनी २००८ साली सुवर्ण सिंहासन दान स्वरूपात दिले

ओबीसींचे उपोषण मागे; राज्य सरकारकडून १४ पैकी १२ मागण्या मान्य

नागपूर : ओबीसी महासंघाकडून नागपुरातील संविधान चौकात साखळी उपोषण सुरू केले होते. मराठा आरक्षणाच्या निर्णयामुळे

मराठा समाजाचा जीआर सरसकटचा नाही

खरे कुणबी असतील त्यांना आरक्षण मिळेल: मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती मुंबई : जरांगे यांच्या आंदोलनानंतर सरकारने

गाईच्या दूध खरेदी दरात वाढ, आता ३५ रुपये प्रतिलिटर दर

सोलापूर : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. खासगी आणि सहकारी दूध संघांनी गाईच्या