Nitesh Rane : भाजपासोबत येण्यासाठी उद्धव ठाकरे व संजय राऊतची लंडनमध्ये झाली बैठक!

भाजपा प्रवक्ते नितेश राणे यांचा दावा


पराभव निश्चित झाल्यामुळे विरोधकांची शेंबड्या मुलासारखी रडारड; नितेश राणेंचा टोला


मुंबई : 'अपेक्षेप्रमाणे विरोधकांची आणि इंडी ब्लॉकच्या नेतेमंडळींची रडारड सुरु झाली आहे. संजय राजाराम राऊतला निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाचा एक्स्टेंडेड हात असल्याचं २०२४लाच आठवतं. २०१४ आणि २०१९ ला जेव्हा उद्धव ठाकरे हे एनडीएमध्ये होते, तेव्हा त्याला कुठेच असं वाटलं नाही. पण आता पराभव निश्चित झाला आहे, त्यामुळे शेंबड्या मुलासारखी रडारड सुरु झाली आहे', असा जोरदार टोला भाजपा प्रवक्ते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी लगावला. त्याचबरोबर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि संजय राऊत (Sanjay Raut) एनडीएमध्ये (NDA) येण्यासाठी तडफडत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.


नितेश राणे म्हणाले, आदरणीय पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) साहेब हे केवळ २०२४ मध्येच ध्यान करण्यासाठी बसले नव्हते. २०१९ मध्ये देखील केदारनाथला जाऊन त्यांनी ध्यान केलं होतं. मग तेव्हा उद्धव ठाकरे आणि संजय राऊतने त्यावर आक्षेप का घेतला नाही? त्यांना तो आचारसंहितेचा भंग तेव्हा का वाटला नाही? कारण तेव्हा मोदीसाहेबांच्या आशिर्वादामुळेच त्यांचे १८ खासदार निवडून येत होते. पण आता जेव्हा खासदार निवडून आणण्याचे वांदे झाले आहेत, तेव्हा मोदीसाहेबांच्या प्रत्येक गोष्टीवर टीका सुरु झाल्या आहेत, असं नितेश राणे म्हणाले.


पुढे ते म्हणाले, संजय राऊतला माझा प्रश्न आहे की, तुम्ही इंडिया आघाडीसोबत तरी प्रामाणिक आहात का? तुम्ही कुठल्या तोंडाने मोदीसाहेब आणि भारतीय जनता पक्षाच्या लोकांवर टीका करत आहात? तुम्ही जास्तच अगर टीका करत असाल तर मग लंडनमध्ये उद्धव ठाकरे आणि संजय राऊतची एनडीएमध्ये येण्याच्या दृष्टिकोनातून कुठली व कोणाबरोबर बैठक झाली? कुठल्या अटीशर्थींवर चर्चा झाली? कुठे झाली? त्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज आम्हाला जाहीर करावे लागतील, असा इशारा नितेश राणे यांनी दिला.


एका बाजूला एनडीएमध्ये येण्यासाठी तडफडायचं, हातपाय जोडायचे, आम्हाला उद्या कसंही एनडीएमध्ये घ्या, आम्हाला काँग्रेस आणि इंडी ब्लॉकच्या लोकांसोबत राहायचं नाही, असं त्या बैठकीमध्ये सांगायचं आणि इथे येऊन नाक रगडायचं आणि मोदीजींवर टीका करायची. सांगलीच्या जागेचं निमित्त घेऊन उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या बाहेर पडणार, हे तुम्ही आताच लिहून ठेवा. जर निवडणुकीच्या काही दिवसांनंतर असं नाही घडलं, तर तुम्ही मला प्रश्न विचारायला या, असं थेट आव्हान नितेश राणे यांनी दिलं.



मुंबई पदवीधरच्या उमेदवारीवरुन मातोश्रीमध्ये महाभारत


अनिल परबने मातोश्रीला ब्लॅकमेल करुन ही उमेदवारी मिळवलेली आहे. अनिल परबला उमेदवारी जाहीर झाल्याच्या दिवसापासून वरुण सरदेसाईने मातोश्रीमध्ये पाऊल देखील ठेवलेलं नाही, असा आरोप नितेश राणे यांनी केला. कारण आम्ही आतापर्यंत ऐकत होतो की वरुण सरदेसाई हे मुंबई पदवीधरचे उमेदवार असणार त्याप्रमाणे मातोश्रीच्या तिसर्‍या माळ्यावर राहणार्‍या वहिनींनी जोर लावला. पण अनिल परबने ब्लॅकमेल करुन ही उमेदवारी मिळवली. त्यामुळे मातोश्रीमध्ये उमेदवारीवरुन काय महाभारत सुरु आहे, हे येत्या काही दिवसांत कळेल, असं नितेश राणे म्हणाले.

Comments
Add Comment

MPSC 2026 चे वेळापत्रक जाहीर, सविस्तर वाचा

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

मुंबई मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, गुंदवलीवरून थेट गाठता येणार मिरा रोड

मुंबई : मुंबईतील मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सध्या गुंदवलीवरून निघालेली मेट्रो दहिसर पूर्व

देशामध्ये २२ बनावट विद्यापीठे

‘यूजीसी’ने जाहीर केली यादी मुंबई  : मान्यता नसलेल्या विद्यापीठांमुळे दरवर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व

आरटीओ कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण अटळ

मुंबई : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आकृतीबंधाची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करावी. सर्व रिक्त पदांवर

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या