काव्यरंग : थेंब थेंब पाणीजागर

पाणी अडवा पाणी जिरवा
सरकारी आदेशच फिरवा
एकदिलाने काम करूया
जलस्त्रोत नव्यानं शोधूया
घसे सुकले, शेत करपले
दाहीदिशात हंडे फिरले
किती मुलांचे राही शिक्षण
पाण्यापरी निव्वळ वणवण


कुठे जरासे फिरकले ‘नाम’
सांगे ज्ञानी आता करा आराम
किती कालवे आम्ही काढले
सारे कसे निर्जलच राहिले
संवर्धन जलाचे करावे कसे?
पाणलोट क्षेत्र भरावे कसे?
जलसंपत्ती देणे ईश्वराचे
हेची गूढ असे विज्ञानाचे


चळवळ वनराई बंधाऱ्याची
हवी मदत लोकसहभागाची
सारे मिळून करू जलसंवर्धन
पुन्हा फिरूनी होई हरितवन
जगभर चाले संघर्ष पाण्यासाठी
कदाचित पाणी कारण युद्धासाठी
आता शहरातही डंका पिटवा
थेंब थेंब पाणीजागर व्हावा.



विवेकानंद यशवंत मराठे, ठाणे (पश्चिम)


अढळ


घराच्या भिंतीना गंध असतो माणसाचा
वर छप्पर आधाराला
टेकू त्यास मायेचा...१


घरात असतो राबता स्नेही नातलगांचा
देवघरात मंद दरवळ
उद, धूप, गंधाचा...२


मिळतं प्रेम, आधार, स्पर्श आपलेपणाचा
बाळासाठी इथे असतो वर्ग सुसंस्कारांचा...३


इथे मेळ आजी, आबो भावंड, आई बाबाचा
सोबतीला वावर मनी,
भुभू,दारी गाईचा..४


घर देतं बळ पंखाना
तू उंच भरारी घेताना विसरू नकोस तुझी
वाट पाहणाऱ्यानां ...५


कधी जरी झालाच घरात अंधार संकटाचा
एक मंद दिवा तेवतो परस्पर विश्वासाचा...६


घर असतंच अढळ
कवेत घेतं केव्हाही
प्रेमाला नाही खळ
हरून आलात तरीही..



- अंजना कर्णिक, मुंबई

Comments
Add Comment

पहिलं पाऊल

- वेध; डॉ. अजिंक्य बोराडे अन्न आणि औषध प्रशासनाने शाळांच्या परिसरात जास्त चरबी, ट्रान्स फॅट आणि साखर असलेल्या

हिमालयातलं पांढरं आच्छादन

- पर्यावरण; मिलिंद बेंडाळे  हिमाचल प्रदेशातील डोंगररांगांकडे पाहताना हिमालयावर जून महिन्यातच बर्फवृष्टी

वाटांशी जडले नाते...

स्मृतीगंध - लता गुठे मला समजायला, उमजायला लागल्यापासून विविध वाटांचे विशेष आकर्षण निर्माण झाले. लहानपणीपासून

अधांतरी हे झुले नभांगण...

नॉस्टॅल्जिया - श्रीनिवास बेलसरे एखाद्या मराठी कवीच्या फक्त एका गाण्याच्या गौरवार्थ दरवर्षी एखादा पुरस्कार

श्वेत भूपतीची कथा

महाभारतातील मोतीकण - भालचंद्र ठोंबरे स्कंध पुराणानुसार सत्य युगामध्ये श्वेत भूपती नावाचा राजा राज्य करीत होता.

अखंड सावधानता...!

संवाद - गुरुनाथ तेंडुलकर इसापनीतीमध्ये एक गोष्ट आहे. एका कोल्हानं एका विहिरीच्या काठावर बसलेला एक कोंबडा पाहिला,