Saturday, October 5, 2024
Homeक्राईमCrime : घरात घुसू्न चाकूच्या धाकाने वृद्ध महिलेला लुटले!

Crime : घरात घुसू्न चाकूच्या धाकाने वृद्ध महिलेला लुटले!

महिलेचे हातपाय बांधले…तोंडात कापसाचा गोळा कोंबला…अन्…

अलिबाग : हेल्मेटधारी अज्ञाताने रेवदंडा पोलीस ठाणे हद्दीतील ७० वर्षीय महिलेच्या घरात मध्यरात्रीच्या सुमारास घुसून तिला चाकुचा धाक दाखवित लुटल्याप्रकरणी रेवदंडा पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

रेवदंडा आगरकोट किल्ल्यात श्रीसिध्देवर मंदिराशेजारी ७० वर्षीय रेश्मा रमेश पाटील या वयोवृध्द विधवा महिला एकटयाच राहातात. १ जून रोजी रात्री बारा ते दीडच्या सुमारास अज्ञात हेल्मेटधारी मोटर सायकलस्वाराने वृद्धेच्या घराचा दरवाजा ठोकावला आणि पाणी पिण्यासाठी मागितले. पाणी देण्यासाठी त्यांनी दरवाजा उघडला असता, अज्ञात हेल्मेटधारी घरात शिरला आणि चाकुचा धाक दाखवित वृद्धेचे हातपाय नायलॉनचे दोरीने बांधून तोंडात कापसाचा बोळा कोंबून त्यांच्या कानातील सोन्याच्या कुडया जबरीने काढून घेतल्या. त्याचबरोबर घरातील कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या डब्यातील सोन्याची बोरमाळ, तसेच रोख रक्कम २५ हजार रूपये असा एकूण एक लाख पंचवीस हजार रूपये किंमतीचा माल चोरून वृद्धेला किचन रूममध्ये कोंडून पळून गेला.

याबाबत रेश्मा रमेश पाटील यांनी रेवदंडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी अज्ञात हेल्मेटधारी चोरटयाच्या विरोधात विविध कलमानव्ये जबरी चोरीचा गुन्हा नोंदविला आहे. दरम्यान, अलिबागटच्या उपविभागीय पोलिस अधिकारी विनीत चौधरी यांनी घटनास्थळी येऊन पहाणी करीत केली असून, रेवदंडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक श्रीकांत किरविले अधिक तपास करीत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -