Bollywood: प्रत्येक सिनेमा सुपरहिट तरीही या अभिनेत्रीने अभिनयाला केले बाय बाय

मुंबई: भारतीय सिने क्षेत्रात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपले करिअर अतिशय उंचीवर असताना अभिनयाला बाय बाय केले आहे. त्यातील एक अभिनेत्री म्हणजे असिन आहे. जिने बॉलिवूडच नव्हे तर अनेक दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम केले आहे.


असिनची सिने क्षेत्रातील सुरूवात मल्याळम सिनेमाने झाली होती. त्यानंतर तिने तेलुगु आणि तामिळ सिनेमांमध्ये काम केले. अनेक दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम केल्यानंतर तिला आमिर खानसह गजनी या हिंदी सिनेमात पदार्पणाची संधी मिळाली.


असिनने अक्षय कुमार, सलमान खान आणि अजय देवगण या अभिनेत्यांसोबतही सिनेमांमध्ये काम केले आहे.असिनने हिंदीमध्ये गजनी, लंडन ड्रीम्स, रेडी, हाऊसफुल्ल २, बोल बच्चन, खिलाडी ७८६, ऑल इज वेल या सिनेमांमध्ये काम केले आहे. विशेष म्हणजे असिनचा प्रत्येक हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपट हिट ठरला होता.


मात्र अचानक करिअरमध्ये एका उंचीवर असताना अभिनेत्रीला बिझनेसमन राहुल शर्मासोबत प्रेम झाले. त्या व्यक्तीसाठी तिने आपल्या करिअरला अलविदा म्हटले आणि संसार सुरू केला.


असिन आता चित्रपटांपासून दर आहे ती आपल्या मुलीच्या देखभालीमध्ये व्यस्त आहे. ती ग्लॅमर इंडस्ट्रीपासून दूर राहत आनंदाचे जीवन जगत आहे.

Comments
Add Comment

ए.आर. रहमान आणि मोहित चौहान राम चरणच्या पेड्डी मध्ये आणणार का संगीताचा तडका?

राम चरण स्टारर पेड्डी मध्ये ए.आर. रहमान आणि मोहित चौहान यांचा होणार धमाकेदार म्युझिक कोलॅबरेशन? भारतीय संगीत

क्षितिज पटवर्धन पहिल्यांदाच दिसणार दिग्दर्शकाच्या भूमिकेत

आई - मुलाच्या गोष्टीत झळकणार लोकप्रिय कलाकार मुंबई : जन्माच्या आधीपासूनच आपल्या आईशी आपलं नातं जुळलेलं असत. आई

कायदेशीर नोटीसमुळे 'हक' प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात

मुंबई  : इमरान हाश्मी आणि यामी गौतमी यांचा आगामी चित्रपट ‘हक’ प्रदर्शित होण्यापूर्वीच कायदेशीर अडचणीत सापडला

'नागिन ७' मध्ये दिसणार प्रियांका चहर चौधरी

मुंबई: अखेर एकता कपूरने, 'नागिन ७' या शोमध्ये यावेळी मुख्य भूमिकेत प्रियंका चहर चौधरी ही अभिनेत्री दिसणार आहे.

बॉलीवूड अभिनेता पंकज त्रिपाठी यांना मातृशोक

मुंबई : बॉलीवूडमधील अभिनेता पंकज त्रिपाठी याची आई हेमवंती देवी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले, त्या ८९

तेजश्री प्रधान 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेतून बाहेर? सोशल मीडियावरील चर्चांवर ; अभिनेत्रीचं स्पष्ट उत्तर

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मध्ये अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या स्वानंदीची