Tuesday, October 8, 2024
Homeक्राईमPune car Accident : ससूनमध्ये बदललेले ब्लड सॅम्पल धनिकपुत्राच्या आईचे? चौकशीबद्दल समजताच...

Pune car Accident : ससूनमध्ये बदललेले ब्लड सॅम्पल धनिकपुत्राच्या आईचे? चौकशीबद्दल समजताच आई गायब!

पुणे अपघातातील मोठी अपडेट समोर

पुणे : पुण्यातील अपघात प्रकारामुळे (Pune car Accident) राज्याचं वातावरण दिवसेंदिवस तापत चाललं आहे. कार चालवणार्‍या अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी अख्खी यंत्रणाच कशा प्रकारे कामाला लागली आहे, याचे रोज नवनवीन खुलासे होत आहेत. त्यातच धक्कादायक बाब म्हणजे ज्या रक्ताच्या नमुन्यांच्या (Blood Samples) आधारे मुलाने गाडी चालवताना मद्यप्राशन केले होते की नाही, हे स्पष्ट होणार होते, ते रक्ताचे नमुनेच ससून रुग्णालयातील (Sassoon Hospital) दोन वरिष्ठ डॉक्टरांनी बदलल्याचे समोर आले. पण मग बदललेले नमुने नेमके कोणाचे होते? असा प्रश्न उपस्थित झाला. या प्रकरणी आता एक मोठा धागा हाती लागला आहे.

बदललेले रक्ताचे नमुने एका महिलेचे होते, असं तपासणीतून समोर आलं आहे. त्यामुळे पुणे पोलिसांचा (Pune Police) मुलाच्या आईवर संशय आहे. या प्रकरणी पोलीस मुलाच्या आईची चौकशी करण्यासाठी अग्रवालांच्या घरी पोहोचले. मात्र, मुलाची आई शिवानी अग्रवाल (Shivani Agarwal) या बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिवाय त्यांचा फोनही बंद लागत आहे. मुलाचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल हे सध्या पोलीस कोठडीत आहेत. मात्र, मुलाची आई गायब असल्याने अग्रवाल कुटुंब पैशांच्या जोरावर या प्रकरणापासून पळ काढत असल्याचे वारंवार स्पष्ट होत आहे.

पोलिसांनी पुणे अपघात प्रकरणात आतापर्यंत १० पेक्षा जास्त जणांना अटक केली असून ससून रुग्णालयातील डॉक्टरांवरही कारवाई होत आहे. त्यातच, डॉ. अजय तावरेंचं निलंबन करण्यात आलं असून ससूनचे डीन विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. आता, याप्रकरणी पोलिसांकडून मुलाच्या आईचीही चौकशी होणार असता, त्या घरात नसून बेपत्ता असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे, सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओनंतर तो व्हिडिओ माझ्या मुलाचा नाही, हे सांगताना ढसाढसा रडणाऱ्या शिवानी अग्रवाल कुठे गेल्या?, असा प्रश्न पोलिसांनाही पडला आहे.

ड्रायव्हरला धमकावल्याप्रकरणी क्राइम ब्रांच टीमकडून शिवानी अग्रवाल यांचा देखील तपास करायचा आहे. त्याच अनुषंगाने पोलिसांकडून त्यांच्या नातेवाईकांना आणि भावांना निरोप देण्यात आला आहे. या धमकी प्रकरणात पोलिसांचे पथक त्यांना ताब्यात घेईल, या भीतीने शिवानी अग्रवाल सध्या बेपत्ता आहेत. तर, त्यांचा फोन देखील बंद आहे. शिवानी अग्रवाल जिथे कुठे असतील त्यांना पोलिसांशी संपर्क साधायला सांगा, असे पोलिसांनी नातेवाईकांना सांगितले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -