पुणे : पुणे पोर्शे अपघात प्रकरणात रोज धक्कादायक खुलासे होत आहे. निकाल दाबण्यासाठी पैसा आणि राजकीय शक्तीचा मोठा वापर झाल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणात आधीपासून अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांचे नाव आधीपासून येत आहे. अपघात झाला, त्या दिवशी आमदार टिंगरे हे पोलीस स्टेशमध्ये गेल्याचेही स्पष्ट झाले होते. १९ मेच्या रात्री वेदांत अगरवाल आणि अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अगरवाल यांनी आमदार सुनील टिंगरे यांना ४५ मिस्ड कॉल केल्याची नवीन माहिती उजेडात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार सुनिल टिंगरे यांना १९ मे रोजी रात्री २.३० ते पहाटे ३.४५ च्या दरम्यान विशाल अग्रवालचे ४५ मिस्ड कॉल आले, परंतु ते झोपेत असल्याने कॉल उचलता आले नाहीत.
डॉ. श्रीहरी हळनोर हे आपत्कालीन विभागात मुख्य वैद्यकीय अधिकारी आहेत. अटक करण्यात आलेले डॉ. हरी हरनोर यांची प्रकृती अचानक बिघडली होती. हळनोरने इन्फेक्शन झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते. या प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या हळनोरने पोलीस जबाबात या प्रकरणातील मास्टरमाईंड हा अजय तावरेंच असल्याचे म्हटले आहे. रक्ताच्या नमुन्यांमध्ये बदल केल्याचा प्रकार आपल्या मनाला पटला नाही. माझ्या हातून हा उद्योग करुन घेण्यात आल्यामुळे मला दोन दिवस झोप लागली नाही, अशी माहिती हळनोरने पोलिसांना दिली.
कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला तपासणीसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्याच्या रक्ताचे नमुने हे सीसीटीव्ही कॅमेरा नसलेल्या ठिकाणी घेण्यात आले आहेत, अशी माहिती या गुन्ह्याच्या तपास अधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता. ३०) न्यायालयात दिली. रक्ताचे नमुने घेतलेल्या ठिकाणाचा पंचनामाही करण्यात आल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले. ज्या ठिकाणी मुलाचे रक्ताचे नमुने घेण्यात आलेले आहे, त्याच्या परिसरातील सीसीटीव्हीमध्ये डॉ. श्रीहरी हाळनोर आणि गटकांबळे यांच्यासह काही साक्षीदार दिसून आले आहेत.
दरम्यान, डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हळनोर आणि शिपाई अतुल घटकांबळे यांच्या पोलिस कोठडीत आणखी ७ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. या तिघांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता, ५ जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अपघात व ब्लड फेरफार प्रकरणात तपास अधिकाऱ्यांनी ससून रुग्णालयातील डॉक्टर आणि शिपायास २७ जूनला अटक केली होती. त्यानंतर, न्यायालयात हजर केले असता, सुरुवातीला ४ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. आता, त्यांच्या पोलीस कोठडीत आणखी ७ दिवसांची वाढ करण्यात आली आहे.