नवी दिल्ली : लोकसभा निवडणुका (Loksabha Election) आता अंतिम टप्पात आल्या असून सर्वांचे डोळे निकालाकडे लागले आहेत. कोणता पक्ष कोणत्या राज्यात बाजी मारणार हे पाहण्यासाठी सर्वजण आतुरले आहेत. सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान (Voting) १ जून रोजी पार पडणार आहे. तत्पूर्वी भाजपा नेत्यांनी ६ टप्प्यांतच भाजपाने विजयाचा आकडा गाठला असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी याबाबत एक वेगळाच खुलासा केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भाजपाला कोणत्या राज्यात सर्वाधिक जागा मिळणार याविषयी त्यांनी सांगितलं आहे. हे राज्य यूपी, मध्यप्रदेश, राजस्थान किंवा गुजरात नसून पश्चिम बंगाल (West Bengal) आहे.
भाजपाला २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा देशातील सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशातून मिळाल्या होत्या. उत्तर प्रदेशातून भाजपला ६३ जागांवर विजय मिळाला होता. महाराष्ट्रातून शिवसेना-भाजप युतीने मिळून ४२ जागा जिंकल्या होत्या. तर, मध्य प्रदेश, राजस्थान, आणि गुजरातमध्येही भाजपला घवघवीत यश मिळालं होतं. मात्र, यंदाच्या निवडणुकीत भाजपला कोणत्या राज्यातून मोठं यश मिळेल याबाबत स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, पश्चिम बंगालच्या निवडणुकीत यंदा तृणमूल काँग्रेस अस्तित्वाची लढाई लढत आहे. येथील राज्यात गत विधानसभा निवडणुकीत आमच्याकडे केवळ ३ आमदार होते. मात्र, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत येथील जनतेने भाजपला भरभरुन साथ दिली. भाजपने ८० जागांवर विजय मिळवला. गत विधानसभा निवडणुकीत आम्हाला मोठं यश मिळालं. त्यामुळेच, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देशात भाजपसाठी बेस्ट परफॉर्मिंगचे स्टेट हे पश्चिम बंगाल असेल, असे मोदींनी म्हटले. भाजपला सर्वात मोठं यश पश्चिम बंगालमध्ये मिळणार आहे. येथील निवडणूक एकतर्फी झाल्याचं मोदींनी म्हटलं.
नरेंद्र मोदींनी ओडिशा विधानसभा निवडणुकांवरही मुलाखतीत भाष्य केलं. मोदी म्हणाले, “ओडिशाकडे प्रचंड नैसर्गिक संसाधने आहेत. एका समृद्ध राज्यातील गरीब लोक पाहून वाईट वाटते. भारतातील समृद्ध राज्यांत ओडिशा आहे. एवढी नैसर्गिक संसाधने आहेत. तसेच, देशातील गरीब लोकांच्या राज्यातही ओडिशा आहे. याला सरकार जबाबदार आहे. यामुळ ओडिशातील लोकांना त्यांचा अधिकार मिळायला हवा. ओडिशाचे भाग्य बदलणार आहे. सरकार बदलत आहे. मी म्हटले आहे की, ओडिशातील सरकारची एक्सपायरी डेट ४ जून आहे आणि १० जूनला भाजपचा मुख्यमंत्री ओडिशात मुख्यमंत्री पदाची शपथ घेईल”, असं मोदींनी स्पष्ट केलं.
पश्चिम बंगालमध्ये ७ टप्प्यात मतदान होत असून गत निवडणुकांच्या तुलनेत यंदा प.बंगालमध्ये मतदानाची टक्केवारी वाढली आहे. आत्तापर्यंत झालेल्या सर्वच टप्प्यात ७६ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान करत प. बंगालच्या मतदारांनी उत्साह दाखवला आहे. संदेशखाली, ओबीसी आरक्षण, शिक्षक भरती घोटाळा आणि नंदीग्राम हिंसा यांसारख्या मुद्द्यांवर येथील निवडणूक चर्चेत होती. मात्र, मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग दाखवत निवडणुकीत सहभाग घेतल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे ४ थ्या टप्प्यात राज्यात ८० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं आहे. त्यामुळे यंदा भाजपाला या ठिकाणी सर्वाधिक जागा मिळणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…