SSC Result 2024 : दहावीच्या निकालातही कोकणच अव्वल! राज्याचा निकाल ९५.८१ टक्के

  143

यंदाही मुलींनीच मारली बाजी


पुणे : महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला असून यंदा दहावीचा एकूण निकाल ९५.८१ टक्के इतका लागला आहे. यंदाच्या निकालात नेहमी प्रमाणे आणि १२ वीच्या निकालाप्रमाणेच १० वीच्या परीक्षेतही मुलींनी बाजी मारली आहे. तर एकूण ९ विभागात घेण्यात आलेल्या परीक्षेत यंदाच्या निकालामध्ये कोकण विभागाने बाजी मारली आहे. तर नागपूर विभाग सर्वात पिछाडीवर म्हणजेच ९४.७३ टक्क्यांसह राज्यातील विभागनिहाय टक्केवारीनुसार सर्वात खाली आहे.


मुलींचा निकाल ९७.२१ टक्के तर मुलांचा निकाल ९४.५६ टक्के लागला आहे. आकडेवारीनुसार, सर्वच विभागांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. ७२ विषयांपैकी १८ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी ९४.८६ टक्के इतकी आहे. यंदाच्या निकालात उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ५ लाख ५८ हजार २१ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. या विद्यार्थ्यांना ७५ किंवा त्यापेक्षा जास्त टक्के मिळाले आहेत.


या परीक्षेत राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, लातूर आणि कोकण या ९ विभागीय मंडळाकडून १५ लाख ६० हजार १५४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील १५ लाख ४९ हजार ३२६ विद्यार्थी प्रत्यक्षपणे प्रविष्ट झाले. तर त्यातील १४ लाख ८४ हजार ४४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण उत्तीर्ण यांची टक्केवारी ९५.८१ टक्के इतकी आहे.



विभागनिहाय निकाल


कोकण : ९९.०१ टक्के
कोल्हापूर : ९७. ४५ टक्के
पुणे : ९६.४४ टक्के
मुंबई : ९५. ८३ टक्के
अमरावती : ९५.५८ टक्के
नाशिक : ९५.२८ टक्के
लातूर : ९५.२७ टक्के
छत्रपती संभाजीनगर : ९५.१९ टक्के
नागपूर : ९४.७३ टक्के

राज्यातील नऊ विभागांमध्ये शुन्य टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या ३८


पुणे : ६
नागपूर: ५
छत्रपती संभाजीनगर : ५
मुंबई : ५
कोल्हापूर : १
अमरावती: ७
नाशिक : ३
लातूर : ६
कोकण : एकाही शाळेचा निकाल शुन्य टक्के लागला नाही.



शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या : ९३८२


पुणे : १५४२
नागपूर : १००७
छत्रपती संभाजीनगर : ८४०
मुंबई : १५३३
कोल्हापूर : १२७०
अमरावती: १०६३
नाशिक विभाग : १००६
लातूर : ६०८
कोकण : ५१३



लातूर पॅटर्नचा दबदबा कायम


दहावी परीक्षेत राज्यातील १८३ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळविले आहेत. यात लातूर विभागाच्या १२३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. लातूर मंडळाचा ९५.२७ टक्के निकाल लागला असून, लातूर पॅटर्नचा दबदबा यंदाही कायम आहे. २०२३ मध्ये राज्यात १५१ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण घेतले होते. यात १०८ विद्यार्थी लातूर मंडळाचे होते.



मुंबई विभागाची टक्केवारी वाढली; आठ विद्यार्थ्यांना १०० टक्के


बारावीच्या परीक्षेत मुंबई विभागाने निराशाजनक कामगिरी केली होती मात्र दहावीच्या निकालात मुंबई विभागाने खुप चांगली कामगिरी केली आहे. गेल्या वर्षी दहावीचा निकाल ९३.६६ टक्के इतका लागला होता मात्र यंदा ९५.८३ टक्के निकाल लागला आहे. इतर विभागांच्या तुलनेत मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे.


मुंबई शहर, उपनगरे, ठाणे, रायगड, पालघर यांचा समावेश असलेल्या मुंबई विभागाचा दहावीचा निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन टक्क्यांनी वाढला आहे. मुंबई विभागातून उत्तीर्ण झालेल्या ३.२५ लाख विद्यार्थ्यांपैकी सुमारे चार टक्के म्हणजे १३,४३० विद्यार्थ्यांना ९० टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या १,६४५ने वाढली आहे. तर आठ विद्यार्थ्यांना १०० टक्के मिळाले आहेत.


यंदा मुंबईतून नियमित ३,३९,२६९ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी ३,२५,१४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी जास्त म्हणजे ९६.९५ टक्के आणि मुलांची ९४.७७ टक्के आहे. यंदा दहावीच्या परीक्षेत एकूण १,६५,४२३ मूली तर १,६४,७६२ मुले पास झाले आहेत. त्यामुळे मुलींचा निकाल यंदा चांगला आला आहे.


ठाण्याच्या नौपाडा येथील सरस्वती सेकंडरी स्कुलच्या अनन्या कुलकर्णी हिने १०० पैकी १०० गुण मिळवत अव्वल कामगिरी केली आहे. ठाण्याच्या ए. के. जोशी शाळेच्या अनुष्का काळे हिनेही १०० टक्के गुण मिळवत चांगली कामगिरी केली असून मुंबईच्या खुशी शिंदे हिनेही आपली चित्रकला आणि कथकचा छंद जोपासत यश मिळविले. मुंबई विभागात १०० टक्के गुण मिळविणा-यांमध्ये सात मुली आहेत. यामध्ये अनन्या कुलकर्णी (सरस्वती सेकंडरी स्कुल, ठाणे), अनुष्का काळे (आनंदीबाई केशव जोशी इंग्लिश मिडियम स्कुल, ठाणे), आर्या ढवळे (सिस्टर निवेदिता इंग्लिश मिडियम हायस्कुल, डोंबिवली), खुशी शिंदे (डीएसआरव्ही, मालाड), शार्वी महंते (कॅर्मेलाईट कॉन्व्हेन्ट हायस्कुल, वसई), सृष्टी काळे (एनआरसी कॉलनी स्कुल, कल्याण), प्रथमेश दाते (सिस्टर निवेदिता इंग्लिश मिडियम हायस्कुल, डोंबिवली), पूर्वा शिर्के (कॅरमल कॉन्व्हेन्ट हायस्कुल, बदलापूर) या विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळविले आहेत.



जाणून घ्या कसा व कुठे पाहायचा निकाल?


महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (Maharashtra Board SSC Result LIVE) घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. दहावीचा यंदाचा एकूण निकाल ९५.८१ टक्के इतका लागला आहे. तर बारावीप्रमाणे दहावीतही कोकण विभागच (Konkan region) अव्वल ठरला आहे.



यंदाही मुलींनीच मारली बाजी


निकालांमध्ये पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ९७.२१ टक्के तर मुलांचा निकाल ९४.५६ टक्के लागला आहे. आकडेवारीनुसार, सर्वच विभागांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. एकूण ७२ विषयांपैकी १८ विषयांचा १०० टक्के लागला आहे.



दहावीचा निकाल कुठे पाहाल?


https://mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://sscresult.mahahsscboard.in
https://results.digilocker.gov.in
https://results.targetpublications.org/



कसा पाहाल निकाल?



  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या mahresult.nic.in या वेबसाईटला भेट द्या.

  • होमपेजवरील दहावीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.

  • तुमच्या लॉगीन डिटेल्स, परीक्षा क्रमांक, आईचं नाव नोंदवा.

  • स्क्रीनवर तुमचा निकाल उपलब्ध होईपर्यंत थांबा.

  • निकाल उपलब्ध झाल्यानंतर तो पीडीएफ फॉरमॅटमध्ये डाऊनलोड करा किंवा त्याची प्रिंट आऊट घ्या.


दहावीचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्याची छापील प्रत काही दिवसांनतर त्यांच्या संबंधित शाळांमध्ये उपलब्ध होईल.

Comments
Add Comment

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

सिंहगडावरुन बेपत्ता झालेला गौतम चार दिवसांनी दरीत जिवंत आढळला

पुणे : पुण्यातील सिंहगड किल्ल्यावरील तानाजी कडा येथून बेपत्ता झालेला २४ वर्षांचा गौतम गायकवाड जिवंत आहे. गौतम

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय, पुण्यात 27 ते 6 तारखेपर्यंत दारू बंदी

पुण्यामध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दारूबंदीचा निर्णय घेतला आहे. पुण्यात २७ ते ६

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड, पालिकेआधी भाजपचा मोठा निर्णय, कोण आहेत अमित साटम?

मुंबई पालिका निवडणुकीच्याआधी भाजपने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड झाली आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या खात्यावर मुख्यमंत्र्यांची नाराजी, बैठकीला शिंदे उपस्थित नसल्याची माहिती

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाराजीच्या बातम्या समोर येत असताना