उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त पुण्यातून धावणार ३३४ उन्हाळी विशेष ट्रेन

पुणे : परीक्षा संपली की वेध लागतात ते सुट्टीचे, बाहेरगावी फिरायला जायचे, त्यामुळे उन्हाळ्यात रेल्वेवर प्रवाशांचा बोजा मोठ्या प्रमाणात वाढतो, हाच बोजा कमी करण्यासाठी आणि प्रवाश्यांचा प्रवास सुखकर करण्यासाठी पुणे रेल्वे विभागाने एक आनंदाची बातमी प्रवाशांना दिली आहे.


या विशेष गाड्यांमध्ये पुणे ते दानापूर मार्गावरील दैनिक विशेष गाडीच्या सर्वाधिक २१२ फेऱ्यांचा समावेश आहे. गाडी क्रमांक ०१४४९ ही विशेष गाडी १ एप्रिल ते १५ जुलै दरम्यान दररोज पुणे येथून सुटणार आहे. तर गाडी क्रमांक ०१४५० ही गाडी ३ एप्रिल ते १७ जुलै या कालावधीत दररोज दानापूर येथून पुण्याकडे धावणार आहे.


याशिवाय पुणे ते नागपूर दरम्यान साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाड्यांचेही नियोजन करण्यात आले आहे. या मार्गावर एकूण ५३ फेऱ्या होणार आहेत. गाडी क्रमांक ०१४६९ ही गाडी २१ एप्रिल ते १४ जुलै दरम्यान प्रत्येक मंगळवारी पुणे येथून सुटेल, तर गाडी क्रमांक ०१४७० ही गाडी २२ एप्रिल ते १५ जुलै दरम्यान दर बुधवारी नागपूर येथून धावणार आहे.


त्याचबरोबर पुणे ते नागपूर मार्गावर आणखी एका विशेष गाडीचीही व्यवस्था करण्यात आली आहे. गाडी क्रमांक ०१४५७ ही १५ एप्रिल ते १५ जुलै दरम्यान दर बुधवारी पुणे येथून सुटणार असून गाडी क्रमांक ०१४५८ ही १६ एप्रिल ते १६ जुलै दरम्यान दर गुरुवारी नागपूरहून धावणार आहे. या गाडीच्या एकूण २८ फेऱ्या नियोजित करण्यात आल्या आहेत.


पुणे ते गाझीपूर सिटी दरम्यान द्विसाप्ताहिक विशेष गाडीही चालवली जाणार आहे. या मार्गावर एकूण आठ फेऱ्या असतील. गाडी क्रमांक ०१४३१ ही गाडी १७ ते २८ एप्रिल दरम्यान मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी पुणे येथून सुटेल, तर गाडी क्रमांक ०१४३२ ही गाडी १९ ते ३० एप्रिल दरम्यान रविवार आणि गुरुवारी गाझीपूर सिटी येथून धावणार आहे.


उन्हाळी सुट्ट्यांमध्ये उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असते. त्यामुळे या अतिरिक्त गाड्यांमुळे प्रवाशांना आरक्षण मिळणे सोपे होईल तसेच रेल्वेतील गर्दी कमी करण्यास मदत होईल, अशी अपेक्षा रेल्वे प्रशासनाने व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

Sunetra Pawar : 'दादांचे प्रगत, पुरोगामी महाराष्ट्राचे स्वप्न सर्वांच्या साथीने पूर्ण करायचे आहे'

पुणे : दादांनी (अजित पवार) तुम्हाला आणि मला दिलेला हा जो विकासाचा वारसा आहे तो वारसा अर्ध्यावर सोडून देणे हे

Meghna Sakore Bordikar : 'परभणी गुंतवणूक परिषदेतून १,६०० कोटींची गुंतवणूक; स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी'

परभणी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात परभणी जिल्ह्यात उद्योगवाढीसाठी पोषक वातावरण निर्माण

Suman Kale Murder Case : पारधी समाजाच्या सुमन काळे हत्या प्रकरणात राज्य शासनाची नव्याने एसआयटी; विशेष तपास पथक गठित

अहिल्यानगर : अहिल्यानगर येथील पारधी समाजातील सुमन काळे यांच्या सन २००७ मधील संशयास्पद पोलिस कोठडीतील मृत्यू

Ashish Shelar : दहिहंडी उत्सवाला युनेस्कोमध्ये घेऊन जाणार, सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री अँड आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्र शासनातर्फे दहिहंडी उत्सवाला युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा यादीत नेण्यासाठी प्रयत्न करीत

Prakash Abitkar : गरीब, गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणासाठी कॉर्पस फंडातून मदत द्यावी - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

गारगोटी येथे रुबी हॉल क्लिनिकच्या माध्यमातून सुसज्ज डायग्नोस्टिक सेंटर उभे करण्याचे नियोजन रुबी हॉल क्लिनिक

106 Maharashtra Martyrs To Be Honored : संयुक्त महाराष्ट्राच्या १०६ हुतात्म्यांना नव्या प्रशासकीय इमारतीत मानाचे स्थान मिळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिवांना कार्यवाहीचे निर्देश मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या