Chhatrapati Sambhajinagar: आर्थिक व्यवहारातून सेवानिवृत्त प्राध्यापकाची हत्या; अखेर थरारक प्रकार उघड

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये आर्थिक व्यवहारातून सेवानिवृत्त प्राध्यापकाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी प्राध्यापकाचा खून करून पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी चित्रपटासारखा बनाव रचल्याचे तपासात समोर आले आहे. मृत प्राध्यापकांचे नाव राजाराम उत्तम लोंढे असे असून ते शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सिव्हिल विभागप्रमुख (HOD) म्हणून कार्यरत होते. या प्रकरणात पोलिसांनी विशाल राठोड, आकाश पवार आणि करण आडे या तिघांना अटक केली आहे.


प्राथमिक माहितीनुसार, मृत प्राध्यापक आणि आरोपींमध्ये सुमारे ५० लाख रुपयांचा आर्थिक व्यवहार झाला होता. ‘खतरों के खिलाड़ी’सारखा टीव्ही शो तयार करून पैसे कमावण्याच्या उद्देशाने हा व्यवहार झाल्याचे तपासात समोर आले आहे. मात्र, पैसे घेतल्यानंतरही बराच काळ कोणताही शो सुरू न झाल्याने प्राध्यापक लोंढे आरोपींकडे वारंवार पैशांची मागणी करत होते.


सततच्या तगाद्यामुळे आरोपींनी प्राध्यापकांना दौलताबाद येथे पार्टीसाठी बोलावले. तेथे पार्टी झाल्यानंतर परत येताना आरोपींनी प्राध्यापकांच्या स्वतःच्या पिस्तुलातून त्यांच्या डोक्यात गोळी झाडून खून केला. त्यानंतर शहरातील एका रुग्णालयाजवळ येईपर्यंत त्यांचा मोबाईल ऑन ठेवण्यात आला, जेणेकरून ते जिवंत असल्याचा भास निर्माण होईल.


आरोपींनी लोंढे यांचा मृतदेह गाडीत ठेवून दुसऱ्या दिवशी शहरालगत असलेल्या गेवराई तांड्याजवळ गुप्तधन असल्याची माहिती एका जेसीबी चालकाला दिली. त्याच्याकडून दोन खड्डे खणून घेतले. पहाटे प्राध्यापकांचा मृतदेह त्यामध्ये पुरण्यात आला. खून केल्यानंतर आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरल्याचा बनाव केला. तसेच मृत राजाराम लोंढे यांचा मोबाईल वारंवार ऑन-ऑफ करण्यात आला. प्रा. लोंढे यांना सिग्मा हॉस्पिटलजवळ सोडल्याची खोटी माहितीही आरोपींनी दिली होती.


या प्रकरणी ६ फेब्रुवारी २०२६ रोजी प्राध्यापक बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी तपासादरम्यान संशयित विशाल राठोड आणि आकाश पवार यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. दोघांची स्वतंत्र चौकशी केली असता त्यांच्या जबाबांमध्ये विरोधाभास आढळून आला आणि पोलिसांचा संशय बळावला. यानंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून सखोल चौकशी केली असता खुनाचा संपूर्ण प्रकार उघड झाला. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.


गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि CCTV फुटेजची तपासणी केली असता, आरोपींच्या जबाबात मोठी तफावत आढळली. पोलिसांनी विशाल राठोडला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी विशाल आणि राजाभाऊ लोंढे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आर्थिक देवाणघेवाणीवरून वाद सुरू होते.

Comments
Add Comment

State Government : राज्यातील १ लाख ६० हजार गोविंदांना १० लाखांचे विमा संरक्षण

अपघाती मृत्यू व अपंगत्वासाठी आर्थिक मदत; वैद्यकीय उपचारासाठी १ लाखांपर्यंतचे कवच मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या

Jalgaon : दोघांचा अपघातात तर एकाचा तलावात बुडाल्याने मृत्यू , एकाच दिवशी तीन दुर्दैवी घटना घडल्याने जळगाव जिल्हा हळहळला

Jalgaon : जळगाव जिल्ह्यात बुधवारी घडलेल्या तीन वेगवेगळ्या दुर्घटनांनी जिल्हा हळहळला आहे. घडलेल्या दुर्घटनांमध्ये

Pratap Sarnaik : १ लाखांहून अधिक अमराठी चालकांनी गिरवले मराठीचे धडे

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; मराठीचा मान राखणाऱ्या प्रत्येकाला महाराष्ट्र कवेत घेईल मुंबई : "

Chandrashekhar Bawankule : नार्को टेस्ट करण्यास मी तयार!

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; मनोज जरांगेंच्या आरोपांवर दिले सडेतोड उत्तर मुंबई :

Ashok Kharat Case : हाताला लकवा तरी..., भोंदू खरातचा आणखी एक कारनामा उघड

Ashok Kharat Case : समता पतसंस्थेच्या राहाता शाखेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) याने पैशांचा भरणा

Devendra Fadnavis : जातपडताळणी समितीच्या कामकाजात राज्य सरकारचा हस्तक्षेप नाही!

मनोज जरांगेंच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण; कोणत्याही मंत्र्याने जाणीवपूर्वक प्रमाणपत्रे रद्द