Vikas Thakre : राऊतांना नागपूरबद्दल कवडीची माहिती नाही; उगाच वायफळ बडबड करु नये!

संजय राऊतांच्या नव्या दाव्यावर काँग्रेसच्या नेत्याचीच आगपाखड


नागपूर : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे नेहमी आपल्या कोणत्या ना कोणत्या वक्तव्यामुळे अडचणीत सापडतात. त्यांनी नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) या भाजप नेत्यांवर आरोप करत एक नवा दावा केला. या नेत्यांनी नागपुरात नितीन गडकरींच्या (Nitin Gadkari) पराभवाचा कट रचला होता, असं ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपकडून तर टीकेची झोड उठलीच पण काँग्रेसनेही (Congress) राऊतांना खडसावलं आहे. नागपुरात गडकरींच्या विरोधात उभे असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार आणि काँग्रेस नेते विकास ठाकरे (Vikas Thakre) राऊतांच्या वक्तव्यामुळे पेटून उठले आहेत. 'म्हणजे तुमचा गडकरींना पाठिंबा होता का?' असा सवाल उपस्थित करत त्यांनी संजय राऊतांना लक्ष्य केलं आहे.


विकास ठाकरे म्हणाले की, मी कुणाचीही रसद घेण्याइतपत भिकार XX नाही. ९ व्यांदा निवडणूक लढतोय. तुम्हाला भाजपात भांडणं लावायचा धंदा दिलाय का? तुमचं नेमकं काम काय आहे? महाविकास आघाडीतला एक पक्ष अशाप्रकारे विधानं करत असेल तर काँग्रेसनं त्यांना समज द्यावी. मी वरिष्ठांना आज याविषयी पत्र लिहिणार आहे. हे लिहिण्यामागचा उद्देश काय, तुम्ही गडकरींच्या बाजूने होता का? अशा शब्दांत विकास ठाकरे यांनी संजय राऊतांचा दावा खोडून काढला आहे.


पुढे ते म्हणाले की, संजय राऊत जे काही बोलतात, त्यांनी पुराव्यानिशी बोलावं, उगाच वायफळ बडबड करून प्रसिद्धीसाठी बोलू नये. गडकरींबाबत त्यांचे प्रेम काय हे निवडणुकीआधी ते बोलले होते म्हणून मी कुणालाच प्रचाराला बोलावलं नाही. त्यांना भाजपाशी काय दुखणं आहे हे त्यांनी पाहावं. परंतु महाविकास आघाडीचा धर्म त्यांनी पाळायला हवा. अन्यथा आम्हाला राऊतांविरोधात बोलायला खूप बोलू शकतो असा इशारा त्यांनी दिला.


तसेच निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही गडकरींची प्रशंसा करत होते. त्यानंतर निवडणूक झाल्यावरही त्यांची प्रशंसा, गडकरींसोबत दुसरा पक्ष काढून महाविकास आघाडी करायची होती. संजय राऊतांनी बोलण्यास तारतम्य बाळगावं. नागपूरच्या विषयात त्यांना कवडीचही माहिती नाही. नागपूरची A, B, C, D ही माहिती नाही असंही विकास ठाकरेंनी सांगत उद्धव ठाकरे गटाला फटकारलं आहे.


Comments
Add Comment

मोठा प्रश्न? कावळेच नाहीत! पितृपक्षात वाडीला शिवणार कोण?

मुंबई : हिंदू धर्मातील पितृपक्ष काळात पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करणे हा पवित्र संस्कार आहे. या काळात घराघरांत

१ कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार - मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर :  प्रत्येक गावात जिल्हा बॅंकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज देऊन

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घ्यायला जात असाल तर आधी हे वाचा

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन आज दिवसभर राहणार बंद मुंबई: कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर हे प्रसिद्ध

देशभरात उद्यापासून “स्वस्थ नारी, सशक्त परिवार" अभियानाला सुरूवात

पालघर : केंद्र सरकारतर्फे महिलांच्या आरोग्याची तपासणी, जनजागृती आणि पोषण सेवांचा प्रसार करण्यासाठी “स्वस्थ

नागपुर पोलिसांची ‘ऑपरेशन शक्ती' अंतर्गत मोठी कारवाई, OYO मध्ये चालला होता भलताच प्रकार

ओयो हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, तिघांना अटक, एक फरार नागपूर: नागपूर शहर पोलिसांच्या ‘ऑपरेशन शक्ती’

श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला महाराष्ट्राच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा

महोत्सवात स्थानिक लोकपरंपरांचे होणार सादरीकरण मुंबई : श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला