Saturday, May 10, 2025

महाराष्ट्रदेशताज्या घडामोडी

Cyclone Remal : महाराष्ट्रालाही रेमल चक्रीवादळाचा धोका? हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा

Cyclone Remal : महाराष्ट्रालाही रेमल चक्रीवादळाचा धोका? हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा

'या' सेवा काही तासांसाठी राहणार बंद


मुंबई : देशातील वातावरणात दिवसेंदिवस बदल होत असताना सध्या बंगालच्या उपसागरात 'रेमल' चक्रीवादळाचा (Cyclone Remal) धोका निर्माण झाला आहे. या रेमल चक्रीवादळाबाबत भारतीय हवामान विभागाने (IMD) अलर्ट जारी केला आहे. हवामानशास्त्राज्ञांच्या अंदाजानुसार रेमल चक्रीवादळ आज भारतातील काही भागात पोहोचणार असून रौद्र रुप धारण करणार आहे. त्याचबरोबर चक्रीवादळाचा धोका लक्षात घेत राज्य प्रशासनाने खबरदारीचे काही उपाय जारी केले.


हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज चक्रीवादळ ताशी ११०-१२० किलोमीटर वेगाने बंगालच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्रात १.५ मीटर उंचीपर्यंत लाटा उसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच मच्छिमारांना बंगाल उपसागराच्या उत्तरेकडील भागात जाण्यास मज्जाव केला आहे. त्याशिवाय रेमलच्या प्रभावामुळे पश्चिम बंगाल, ओडिशा, मिझोराम ते बिहारपर्यंत पावसाचा अंदाज दिला आहे.


दरम्यान, आज रात्री उशिरा हे वादळ किनारपट्टीवर धडकणार असून खबरदारी म्हणून कोलकाता विमानतळ आज दुपारी १२ ते सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत बंद असणार आहे. तर दुसरीकडे चक्रीवादळामुळे आज संध्याकाळी ६ वाजल्यापासून बंगालमधील श्यामा प्रसाद मुखर्जी बंदरातील सर्व मालवाहू आणि कंटेनर हाताळणी व्यवस्था १२ तासांसाठी बंद असणार आहे.



'या' भागात पावसाचा इशारा


हवामान विभागाकडून ओडिशाच्या बालासोर, भद्रक आणि केंद्रपारा या किनारी जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर आसाम आणि मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोराम, मणिपूर आणि त्रिपुरामध्ये २७ आणि २८ मे रोजी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसे कोलकाता, हावडा, नादिया आणि पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.



'रेमल' चक्रीवादळाचा महाराष्ट्रालाही धोका?


हवामान खात्याने २६-२७ मे रोजी दक्षिण २४ परगणामध्ये १०० ते ११० किमी प्रतितास आणि उत्तर २४ परगणामध्ये ताशी ९० ते १०० किमी प्रतितास ते ११० किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा इशारा दिला आहे. तसेच या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नाही, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.


­

Comments
Add Comment