राजकोट: गुजरातच्या राजकोटमध्ये टीआरपी झोनमध्ये आग लागल्याने २७ जणांचा मृत्यू झाला आहे. यात ९ मुलांचा समावेश आहे. शनिवारी आगीची सूचना मिळताच फायर ब्रिगेट टीमने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. गेमिंग झोनमध्ये आग लागली तेव्हा तिथे मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते. कारण शनिवारचा सुट्टीचा दिवस होता. सुट्टीच्या दिवशी गर्दी व्हावी म्हणून गेमिंग झोन मॅनेजमेंटने ९९ रूपयांची एंट्री फी ठेवली होती. सुट्टी असल्याने आणि ९९ रूपये फी असल्याने तेथे लोकांची मोठी गर्दी झाली होती.
आग आणखी भडकली ती तेथील स्टोर केलेल्या डिझेल-पेट्रोलमुळे. गेमिं झोनमध्ये १५०० ते २००० लीटर डिझेल आणि गो कार रेसिंगसाठी १००० ते १५०० लीटर पेट्रोल ठेवण्यात आले होते. या दुर्घटनेत आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे.
गुजरातचे गृह मंत्री हर्ष सांघवी रात्री उशिरा घटनास्थळी पोहोचले. यावेळी मीडियाशी बोलताना ते म्हणाले, राजकोटमध्ये खूपच दुख:द घटना घडली. अनेक कुटुंबांनी आपल्या प्रिय व्यक्तींना गमावले आहे. तसेच अनेक मुलांचा मृत्यू झाला आहे. एसआयटीला तपासाचे आदेश देण्यात आले आहेत.
गेमिंग झोनमध्ये आग लागल्याच्या घटनेची माहिती देताना कलेक्टरनी सांगितले, सुरूवातीच्या तपासा आग लागण्याचे इलेक्ट्रिक कारण सांगितले जात आहे. दरम्यान, याचे मुख्य कारण अद्याप समोर आलेले नाही. या गेमिंग झोनला फायर विभागाकडून NOC मिळालेले नव्हते. त्यांनीही यासाठी कोणताही अर्ज केलेला नव्हता.
गेमिंग झोनमध्ये होते पेट्रोल-डिझेलचे भंडार
टीआरपी गेमिंग झोनमध्ये १५०० ते २००० लीटर डीझेल जनरेटर आणि गो कार रेसिंगसाठी १००० ते १५०० लीटर पेट्रोल जमा होते. तसेच गेमिंग झोनमधून बाहेर निघण्यासाठी आणि प्रवेशासाठी ६ ते ७ फूट इतका एकच रस्ता होता. शनिवारी एंट्रीसाठी ९९ रूपयांची स्कीम होती. यामुळे येथे गर्दी होती.