सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील वेंगुर्ल्यामध्ये (Sindhudurga Vengurla) काल मासेमारी (Fishing) करणारी एक बोट उलटली. या बोटीमध्ये एकूण ७ खलाशी होते. या ७ जणांपैकी तिघांनी पोहत किनारा गाठला. मात्र, चारजण बेपत्ता होते. त्यापैकी दोघांचे मृतदेह काल सापडले तर इतर दोघांचे मृतदेह आज सापडले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वेंगुर्ला बंदरातून रात्री मच्छिमारांना लागणारी बर्फाची वाहतूक सुरू असताना ही दुर्घटना घडली. काल रात्री हे सर्वजण मच्छीमारीसाठी लागणारा बर्फ घेऊन बोटीतून निघाले होते. मात्र, अचानक सुरु झालेल्या वादळी वार्यामुळे ही बोट हेलकावे खात पाण्यात बुडाली. ७ मच्छीमारांपैकी तिघांनी पोहून किनारा गाठल्याने ते बचावले. मात्र इतर चौघांचा मृत्यू झाला.
मृ झालेल्या खलाशांपैकी एक खलाशी रत्नागिरीतील तर तीन खलाशी मध्यप्रदेशातील होते. आझाद मुनीलाल कोल, चांद गुलाल महमद, शिवराम कोल हे तिघे मध्य प्रदेशातील तर महादेव शंकर आंबेरकर हा मूळचा रत्नागिरीचा होता. हे सर्व खलाशी वेंगुर्ले येथे मासेमारी बोटीवर कामाला होते.
महाराष्ट्रात या आठवड्यात १० दुर्घटना घडल्या असून यात ४० निष्पापांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये बोट पलटून मृत्यू झाल्याच्या तीन घटना घडल्या आहेत. सिंधुदुर्गात चौघांचा, उजनीत सहा आणि प्रवरा नदीत एसडीआरएफची बोट उलटल्याने सहा जणांचा मृत्यू झाला. बोट पलटून तब्बल १६ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच डोंबीवली एमआयडीसी दुर्घटनेतील मृतांचा आकडाही वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…