Sunday, April 20, 2025
Homeक्राईमPune Car accident : पुणे अपघातप्रकरणी धनिकपुत्राच्या आजोबांनाही अटक!

Pune Car accident : पुणे अपघातप्रकरणी धनिकपुत्राच्या आजोबांनाही अटक!

काय आहेत सुरेंद्रकुमार अग्रवालांवरील आरोप?

पुणे : पुण्यात वेदांत अग्रवाल नावाच्या एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत कार चालवत दोन तरुणांना चिरडल्याने राजय्भराचं वातावरण ्तयंत तापलं आहे. या मुलावर कठोर कारवाईची मागणी होत असून या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणा-यांवरही कडक कारवाई व्हावी, अशी मागणी केली जात आहे. त्यातच या प्रकरणी आता मुलाचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल यांनाही अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन आरोपी वेदांत सध्या बालसुधारगृहात आहे. सर्वात प्रथम त्याचे वडील व पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली होती. यानंतर आता आजोबांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ड्रायव्हरला धमकी देणे आणि डांबून ठेवल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघात प्रकरणात मुलाचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल यांची गुरुवारी (२३ मे) चौकशी करण्यात आली. या चौकशीत आजोबांनी मुलाला कारची चावी दिल्याची कबुली दिली होती. तसेच नातू अल्पवयीन असल्याचा देखील दावा त्यांनी केला होता. नातवावर खटला अल्पवयीन म्हणूनच चालवावा, अशी मागणी सुरेंद्र अग्रवाल यांनी केली होती.

यानंतर काल झालेल्या सुनावणीत या प्रकरणी अग्रवाल फॅमिलीचा ड्रायव्हर गंगाराम पुजारीला अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला. अपघात झाला त्यावेळी मुलगा नव्हे तर ड्रायव्हर गाडी चालवत होता असा जबाब अल्पवयीन मुलासह त्याच्या दोन मित्रांनी नोंदवला. परंतु ड्रायव्हरने मुलाच्या वडिलांनीच ही गाडी मुलाला चालवायला दिल्याचा जबाब नोंदवला होता. शिवाय मुलगा दारु प्यायला आहे व तो गाडी चालवण्याच्या अवस्थेत नाही, हेदेखील वडिलांना माहित होते, असं ड्रायव्हरने सांगितलं.

या प्रकरणी सुरेंद्र कुमार आणि विशाल या दोघांनी मिळून ड्रायव्हर गंगाराम पुजारीला दोन दिवस डांबून ठेवल्याचा आरोप आहे. मुलाला वाचवण्यासाठी त्यांनी ड्रायव्हरला योग्य तो जबाब देऊ दिला नाही किंवा तसा प्रयत्न केला, असा गुन्हा दाखल केला आहे. सुरेंद्र कुमार अग्रवालला दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे तर काल न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आलेल्या विशाल अग्रवालचा पुन्हा पुणे पोलिस ताबा घेणार आहेत.

दरम्यान, सुरेंद्र अग्रवाल हे पुण्यातील बांधकाम व्यवसायातील मोठे नाव आहे. जेवढे अग्रवाल यांचे नाव प्रसिद्ध आहे तेवढेच वादग्रस्त आहे. छोटा राजनशी संबंध असल्याच्या आरोपातून त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचा खटला देखील सुरु आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -