PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी वाराणसीतून साधणार 'स्त्री शक्ती' संवाद

कार्यक्रमात दिसणार संस्कृतीची झलक; तब्बल २५ हजार महिलांचा समावेश


लखनऊ : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) रणधुमाळीत निवडणुकीचे पाचही टप्पे यशस्वीरित्या पार पडले आहेत. आता सहाव्या टप्प्यासाठी राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. देशभरात निवडणुकीच्या प्रचार सभेचा धुरळा उडत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आपला मोर्चा उत्तर प्रदेशाकडे (Uttar Pradesh) वळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी (Varanasi Loksabha) दौऱ्यावर जाणार असून तेथे 'स्त्री शक्ती' सोबत संवाद साधणार आहेत.


येत्या १० दिवसांत मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर सायंकाळी साडेचार वाजता मोदी वाराणसी येथील डॉ.संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठात मातृशक्ती परिषदेला संबोधित करणार आहेत. यावेळी कार्यक्रमात तब्बल २५ हजार महिला सहभागी होणार आहेत. कोणत्याही राजकीय पक्षाकडून एवढ्या मोठ्या संख्येने महिला संमेलन आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. विशेष बाब म्हणजे या कार्यक्रमातील सर्व जबाबदाऱ्या महिलाच सांभाळणार आहेत. तसेच भाजपाने वाराणसी लोकसभा मतदारसंघातील सर्व १००९ बूथमधून महिलांचा सहभाग सुनिश्चित केला आहे. त्यामुळे या सभेला विशेष राजकीय महत्त्व आहे.


दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत, स्टेज व्यवस्थापन आणि कार्यक्रमातील इतर व्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी नारीशक्तीच्या खांद्यावर आहे. पंडालमध्ये मिनी इंडियाचे रूपही पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मोदीजी महिलांना काय संदेश देणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


Comments
Add Comment

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान केरळ दौऱ्यावर, अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांना लावणार हजेरी

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान केरळच्या दौऱ्यावर असतील. हा दौरा

दिल्लीकर गुदमरले, मुंबईकरांचे काय?

दिवाळीनंतर दोन्ही महानगरांची हवा झाली विषारी फटाक्यांच्या प्रदूषणामुळे दिल्ली-एनसीआरचा AQI ४०० पार, मुंबईचाही

दिवाळीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींचं देशवासियांना भावनिक पत्र

नवी दिल्ली : दिवाळीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना एक भावनिक पत्र लिहून शुभेच्छा दिल्या

१० कोटींच्या चिनी फटाक्यांची तस्करी : डीआरआयच्या ऑपरेशन फायर ट्रेलची मोठी कारवाई

नवी दिल्ली: भारताच्या सीमांवरून चिनी फटाक्यांची बेकायदेशीर आयात करण्याचा मोठा डाव महसूल गुप्तचर संचालनालयाने

नागा अतिरेक्यांवर ड्रोन स्ट्राईक ? भारतविरोधी पी. आंग माई ठार ?

नायपिदाव : भारत-म्यानमार सीमेवर बंडखोरांच्या हालचाली वाढू लागल्यामुळे तणावाची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर २०

रेड कॉरिडॉर आता ग्रोथ कॉरिडॉर बनला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे पोलिस स्मृतीदिनानिमित्त वक्तव्य

नवी दिल्ली: पोलीस स्मृतीदिनानिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देशातील पोलीस आणि सुरक्षा दलांच्या