Jio चा शानदार प्लान, एकदा रिचार्ज करा मिळवा ७३० जीबी डेटा

  73

मुंबई: जिओ आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक रेंजमध्ये डेटा प्लान सादर करत असते. काहींना महिन्याभराची व्हॅलिडिटी असलेले प्लान हवे असतात तर काहीजण वर्षाच्या प्लानच्या शोधात असतात. यासाठी कंपनीही खास ऑफर देत असते. अशातच काही जण दर महिन्याला रिचार्ज करण्याऐवजी वर्षासाठीचे एकदाच रिचार्ज करत असतात. तुम्हीही अशा प्लानच्या शोधात आहात तर जिओ एक खास प्लान सादर करत आहे. जिओच्या अधिकृत पेजवरून कंपनीने ग्राहकांसाठी ३२२७ रूपयांचा खास प्लान आणला आहे.


जिओच्या ३२२७ रूपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना ३६५ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. म्हणजेच तुम्ही एकदा रिचार्ज केल्यास वर्षभर बघायला नको. या प्लानमध्ये युजर्सला दिवसाला २ जीबी डेटा दिला जातो. म्हणजेच ३६५ दिवसांच्या हिशेबाने हा डेटा ७३० जीबी होईल.


खास बाब म्हणजे ग्राहकांना या प्लानमध्ये १ वर्षासाठी अॅमेझॉन प्राईम व्हिडिओचे सबस्क्रिप्शन दिले जात आहे. दरम्यान हे प्राईम व्हिडिओ मोबाईल एडिशन म्हणून दिले जात आहेत. याशिवाय जिओ सिनेमा, जिओ क्लाऊड, जिओ टीव्हीचा अॅक्सेसही मिळेल. या प्लानमध्ये ग्राहकांना फ्री कॉलिंगचीही सुविधा मिळत आहे.



हे प्लानही एक वर्ष चालतील


३२२७ रूपयांच्या प्लानशिवाय जिओेने वर्षभरासाठीचे आणखी प्लान्स सादर केले आहेत. यांचीही व्हॅलिडिटी ३६५ दिवसांची आहे. या प्लानची किंमत २९९९ रूपये आणि ३३३३ रूपये आहे. जिओच्या २९९९ रूपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना दिवसाला २.५ जीबी डेटा दिला जातो. या प्लानची व्हॅलिडिटी १ वर्षे आहे. प्लानमध्ये फ्री कॉलिंगसोबत जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचाही अॅक्सेस देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता