मुंबई : ‘बिग बॉस’ रिअॅलिटी शोमधून (Bigg Boss reality show) प्रसिद्धी मिळवलेला मॉडेल आणि गायक सुशांत दिवगीकरच्या (Sushant Divgikar) घरात शनिवारी रात्री आग लागली. सुशांतच्या मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरातील एसीचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागली. शनिवारी रात्री ११च्या सुमारास ही घटना घडली. काही क्षणांत आग पसरल्याने घरातील मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले. सुदैवाने सुशांत व त्याचे कुटुंबिय सुखरुप आहेत. आगीच्या घटनेने त्याच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे.
सुशांत दिवगीकरच्या घरातील या स्फोटाबाबत त्याच्या मॅनेजरने माहिती दिली. त्याने सांगितले की, “घरातील हॉलमध्ये सगळे जण शनिवारी रात्री जेवण करत असताना एसीमध्ये स्फोट होऊन आग लागली. मग लगेचच ही आग स्वयंपाकघरात आणि ऑफिसमध्ये पसरली. या घटनेत अवॉर्ड्स, घरातील काही उपकरणं, फर्निचर आणि काही महत्त्वाची कागदपत्रे जळाली आहेत. सुशांतचा मेकअप व त्याचे कपडेही या घटनेत जळाले आहेत,” असं मॅनेजरने सांगितलं.
“घरातील बरंच सामान जळालं आहे, सुशांतचं मोठं नुकसान झालं आहे पण सुदैवाने घरातील सर्व सदस्य सुखरुप आहेत. सुशांत सध्या त्याच्या आई-वडिलांच्या घरी राहतो. या घटनेनंतर त्याला मोठा धक्का बसला आहे, घराचे खूप मोठे नुकसान झाले आहे, मात्र कोणत्याही सदस्याला इजा झालेली नाही,” अशी माहिती सुशांतच्या मॅनेजरने दिली.
सुशांत हा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तो त्याचे फोटो व रील्स इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो. अभिनेत्याचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. सुशांत जुलै २०१४ मध्ये मिस्टर गे इंडियाचा विजेता ठरला होता. मग त्याने मिस्टर गे वर्ल्ड २०१४ मध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. तसंच त्याच्या पुरुष व महिला अशा दोन्ही आवाजांतील गायकीसाठी तो प्रसिद्ध आहे. त्याने दोन आवाजात गायलेलं ‘अप्सरा आली’ हे मराठी गाणं चाहत्यांना विशेष आवडतं.
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…